तो रविवारी सुटीच्या दिवशी करायचा चोरीचा ‘धंदा’

124

चांदवडला दिवसभर एका गावात ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेला संशयित रविवारच्या सुट्टीच्या दिवशी फावल्या वेळेत महिलांच्या गळ्यातील स्त्रीधन ओरबडण्याचा धंदा करायचा, असा प्रकार शहर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. त्याच्याकडून रविवारी सुट्टीच्या दिवशी त्याने केलेल्या पाच सोनसाखळ्या ओरबडण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

पोलिसांनी त्याच्याकडून ५ गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला

विपुल रमेश पाटील असे संशयिताचे नाव आहे. तो चांदवड तालुक्यात ग्रामसेवक आहे. त्याची पत्नी उच्चशिक्षित असून घरची कौटुंबिक परिस्थिती चांगली आहे. त्याचा अयोध्यानगर आडगाव येथे रहिवास आहे. दुपारी तेथून शहरात यायचा. त्यानंतर हे गुन्हे करायचा. असे तपासात पुढे आले आहे. तो सुट्टीच्या दिवशी नाशिक शहरात येऊन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या ओरबाडून गुन्हे करायचा, असे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ५ गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच त्याने महिलांच्या गळ्यातील ओरबाडून नेलेल्या विविध गुन्ह्यातील चार लाख ९४ हजार ८५९ रुपयाच्या ११ तोळे वजनाच्या सोन्याच्या लगडी, एक प्लेझर मोपेड स्कूटर, असा सुमारे पाच लाख १४ हजार ८५९ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

(हेही वाचा ‘आम्ही ओबीसींचा इम्पिरिकल डेटा मागत होतो पण…’, भुजबळांनी केला गंभीर दावा!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.