अखेर राज्यातील १०६ नगर पंचायतीच्या निवडणुका ओबीसीशिवाय…

121

सर्वौच्च न्यायालयाने दणका दिल्यावर राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 106 नगर पंचायतीच्या आणि दोन जिल्हा परिषदांच्या निवडणुकांवर 18 जानेवारी रोजी मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकांची एकत्रित मतमोजणी 19 जानेवारी रोजी होणार आहे, असा मोठा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी ओबीसींच्या 27 टक्के आरक्षणाला स्थगिती दिली होती. तसेच सध्या जाहीर झालेल्या 106 नगर पंचायतींच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचे आदेश दिले होते.

निवडणूक आयोगाने तत्पूर्वीच निवडणूक जाहीर केलेली

राज्य सरकारने तीन महिन्यांत ओबीसी आरक्षणाविषयीचा डेटा तयार करण्याचा आदेशही दिला होता. मात्र ओबीसींचा इम्पेरिकल डेटा गोळा होईपर्यंत विद्यमान निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती राज्य सरकारने केली होती. तसा ठरावही कॅबिनेटमध्ये मंजूर करण्यात आला होता. निवडणूक आयोगाने तत्पूर्वीचीच निवडणुकांची तारीख जाहीर केली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आताच्या निर्णयानुसार, नगरपंचायतींच्या निवडणुका आता पुढील वर्षात होतील. यापूर्वी 21 डिसेंबर रोजी मतदान होऊन 22 डिसेंबर रोजी मतमोजणीच्या तारख्या जाहीर झाल्या होत्या. मात्र आता त्यात बदल करण्यात आला असून या जाहीर झालेल्या सर्वच निवडणुका पुढील वर्षात होतील. राज्यातील 32 जिल्ह्यांतील 106 नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठीचे मतदान 18 जानेवारी 2022 रोजी होईल व 19 जानेवारी रोजी विद्यमान निवडणुकांचा निकाल लागेल. ओबीसींचा इम्पिरीकल डेटा गोळा होईपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती राज्य सरकारने केली होती. कॅबिनेटमध्ये तसा ठराव झाला होता. तरीही आयोगाने राज्य सरकारची विनंती न ऐकता निवडणुका पुढे ढकलल्या आहेत.

(हेही वाचा नांदगावरकर ‘मनसे’ सोडणार! चर्चेला पूर्ण विराम; म्हणाले ‘तेरे नाम से सुरू…’)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.