भुसावळमध्ये भाजपला मोठं खिंडार पडल्याची समोर येत आहे. भाजपच्या तब्बल 21 नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवारांच्या उपस्थितीत हे 21 नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार आहे. राष्ट्रवादीत दाखल झाल्यानंतर एकानाथ खडसेंनी भुसावळमध्ये भाजपला मोठे खिंडार पाडले आहे. 21 नगरसेवकांचा हा राष्ट्रवादीचा पक्षप्रवेश झाल्याने राष्ट्रवादी नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे.
सोन्याची किंमत सर्वांनाच कळते असे नाही
भाजपच्या तब्बल 21 नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर अजित पवारांनी भाजपाला टोला लगावत असे म्हटले की, जळगाव जिल्ह्यातील सोन्याची किंमत सर्वांनाच कळते असे नाही. तर खडसे यांनी 40 वर्षे भाजपसाठी काम केले, एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीत येण्याने आनंद झाला, आता जळगाव जिल्हा राष्ट्रवादीमय करायचा आहे, असे अजित पवार म्हणाले.
(हेही वाचा – नांदगावरकर ‘मनसे’ सोडणार! चर्चेला पूर्ण विराम; म्हणाले…)
महाजन यांना खडसेंनी शह
निवडणुकीच्या आधी एकनाथ खडसे यांनी प्रवेश केला असता तर बरं झाले असते, जळगाव जिल्ह्यात आज परिस्थिती वेगळी असती, जळगावात राष्ट्रवादीचा एकच आमदार आहे, खडसे आधी आले असते तर पूर्ण जिल्हा आपला असता, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे. भाजपच्या तब्बल 21 नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश महाजन यांना खडसेंनी शह दिला आहे.