राज ठाकरेंनी निवडली महिला ब्रिगेड!

117

रुपाली पाटील ठोंबरे यांनी मनसेला रामराम ठोकल्यानंतर पुण्यातील मनसेचं महिला नेतृत्त्व कमकुवत झाल्याचे बोलले जात होते. कारण गेल्या चौदा वर्षांपासून मनसेला पुण्यात रुपाली पाटील यांच्यामार्फत बेधडक महिला नेतृत्त्व मिळालं होतं. मात्र आता मनसे प्रमुख राज ठाकरे हे तीन दिवसीय पुणे दौऱ्यावर आले असता, पुन्हा एकदा पक्षाचे महिला संघटन बळकट करण्याच्या हेतूने त्यांनी प्रयत्न सुरु करत शाखाध्यक्ष पदी महिलांची निवड केली आहे.

शाखाध्यक्षपदी १३० महिला

शहर महाराष्ट्र नवनिर्माण ‘महिला’ सेनेच्या शाखाध्यक्ष पदी १३० महिलांना राज ठाकरे यांच्या हस्ते आज नियुक्ती पत्र देण्यात आले. त्यानंतर सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी दगडूशेठ गणपती बाप्पांची आरती केली. शहरातील पक्ष कार्यालयात ही नियुक्ती पत्र देण्यात आली.

( हेही वाचा : आता पुणे विद्यापीठात घ्या संरक्षणविषयक धडे! )

रुपाली पाटील यांनी दिला राजीनामा

मनसेच्या माजी नगरसेविका आणि प्रवक्त्या रुपाली पाटील यांनी मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. रुपाली पाटील यांनी पक्षातील सर्व पदांचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा देत रूपाली पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यामुळेच पुण्यातील मनसेचं महिला नेतृत्त्व कमकुवत झाल्याचे बोलले जात होते. म्हणूनच राज ठाकरेंनी महिला नेतृत्व बळकट करत शाखाध्यक्ष पदी महिलांची निवड केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.