तामिळनाडूतील हेलिकॉप्टर अपघातात गंभीर जखमी झालेले हवाई दलाचे गृप कॅप्टन वरुण सिंह यांचे बुधवारी निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर आज, शुक्रवारी भोपाळमध्ये लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वरुण सिंह अमर रहे… भारत माता की जय… अशा घोषणांनी परिसर निनादून गेला होता. वरुण सिंह यांचे भाऊ आणि मुलाने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. मुलाला अखेरचा निरोप देताना वडील कर्नल के. पी. सिंहही भावुक झाले होते.
(हेही वाचा- काँग्रेसपाठोपाठ आता भाजपचं मिशन गोवा)
यापूर्वी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी वरुण सिंह यांना श्रद्धांजली वाहिली. वरुण सिंह यांच्या मुलाला शिवराज सिंहांनी धीर दिला. यासह भारतीय सैन्याच्या तिन्ही दलातील अधिकाऱ्यांनीही वरुण सिंह यांना श्रद्धांजली वाहिली. तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये गेल्या 8 डिसेंबर रोजी सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला भीषण अपघात झाला. या हेलिकॉप्टर अपघातात 14 पैकी 13 जणांचा मृत्यू झाला. तर वरुण सिंह हे त्यातून बचावले होते. पण ते गंभीर जखमी होते. जवळपास 8 दिवस त्यांनी मृत्युशी झुंज दिली. बेंगळुरूतील लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
वरुण हे यूपीतील रहिवासी
ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे उत्तर प्रदेशातील देवरिया येथील खोरमा कान्होली गावचे रहिवासी होते. त्यांच्यावर बेंगळुरू येथील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू होते. वरुण हा ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमानचा बॅचमेट आहे. अभिनंदन वर्धमान यांनी 27 फेब्रुवारी 2019 रोजी भारताच्या सीमेत घुसलेल्या पाकिस्तानी विमानांना हुसकावून लावले होते.
Join Our WhatsApp Community