प्रवाशांचा खोळंबा! रविवारी मध्य रेल्वेच्या ‘या’ मार्गावर मेगाब्लॉक

113

सुट्टीच्यादिवशी अनेकजण फिरण्यासाठी घराबाहेर पडतात पण, दर रविवारी मुंबईत लोकलचा मेगाब्लॉक असल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होतो. रविवार १९ डिसेंबरला देखभालीचे काम करण्यासाठी हार्बर मार्गावर खालीलप्रमाणे मेगाब्लॉक असणार आहे.

या मार्गावर असणार मेगाब्लॉक

१. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी / वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत

२. चुनाभट्टी/वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत

३. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

४. पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

५. तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. 8) दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील.

६. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

( हेही वाचा : सफाई कामगारांच्या आश्रय योजनेतील भ्रष्टाचाराची तक्रार आता राज्यपालांकडे )

प्रशासनाने केली व्यक्त दिलगिरी

हा मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगिरी व्यक्त केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.