भारताची अवकाश भरारी! अग्नी प्राइम क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी 

109

भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) नव-नवीन क्षेपणास्त्रे काढून नवीन क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी करत आहे. शनिवारी सकाळी 11.15 च्या सुमारास भारताने अग्नी प्राइम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. अग्नी प्राइम हे अग्नी वर्गाच्या क्षेपणास्त्रांतील प्रगत प्रकार आहे. हे 1,000 ते 2,000 किमी अंतरापर्यंत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. या चाचणीदरम्यान अण्वस्त्र-सक्षम क्षेपणास्त्र अग्नी प्राइममध्ये अनेक नवीन वैशिष्ट्ये जोडण्यात आल्याचे एएनआयच्या अहवालात म्हटले आहे.

(हेही वाचा – घरी ३१ डिसेंबरची पार्टी करताय! पालिकेची असणार नजर)

या क्षेपणास्त्रावर लक्ष ठेवण्यासाठी सागरी किनाऱ्यावर टेलीमेट्री आणि रडार स्टेशन बसवण्यात आले होते. चाचणीत असे आढळून आले की अग्नी प्राइम हे इतर अग्नी क्षेपणास्त्रांपेक्षा हलके आहे आणि ते सर्व उद्दिष्टे उच्च पातळीच्या अचूकतेने पूर्ण करतात. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे. 4000 किलोमीटरच्या रेंजच्या अग्नी 4 आणि अग्नी 5 क्षेपणास्त्रातील तंत्रज्ञान एकत्र करुन हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आलं आहे.

 

या क्षेपणास्त्राची 1000 ते 1500 किलोमीटर पर्यंत मारा करण्याची क्षमता आहे. 2 स्टेज आणि सॉलिड इंधनवर आधारित अग्नी प्राइम क्षेपणास्त्राचा अ‍ॅडव्हान्स रिंग लेझर जायरोस्कोपवर आधारित नेव्हिगेशन यंत्रणेद्वारे वापर केला जातो. त्याची मार्गदर्शक प्रणाली इलेक्ट्रो मेकेनिकल अ‍ॅक्ट्यूएटरने सुसज्ज आहे.

अग्नी प्राइम क्षेपणास्त्रे आणि त्यांची रेंज

  • अग्नी-1: SLV-3 बूस्टर यामध्ये वापरण्यात आले आहे, त्याची रेंज 700 किमी आहे. त्यात लिक्विड फ्यूल भरले जाते. त्याची पहिली चाचणी 28 मार्च 2010 रोजी झाली. हे क्षेपणास्त्र आपल्यासोबत आण्विक साहित्य वाहून नेण्यास सक्षम आहे.
  • अग्नी 2: या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची रेंज 3000 किमी आहे. ते 1000 किलोपर्यंत साहित्य वाहून नेण्यास सक्षम आहे.
  • अग्नी 3: अग्नी 3 ची मारक क्षमता 3000 किमी पर्यंत आहे. जरी ते 4000 किमी पर्यंत वाढविले जाऊ शकते. हे 600 ते 1800 किलोग्रॅमपर्यंतच्या अणु सामग्रीसह सुसज्ज असू शकते.
  • अग्नी 4: 4000 किमीपर्यंत मारा करणारे हे क्षेपणास्त्र संपूर्ण पाकिस्तान आणि अर्ध्याहून अधिक चीनला वेढू शकते. तसेच हे अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र आहे.
  • अग्नी 5: अग्नी 5 ची पहिली चाचणी एप्रिल 2012 रोजी घेण्यात आली. या क्षेपणास्त्राने भारतीय सैन्याला संपूर्ण चीनला लक्ष्य करता आले. त्याची श्रेणी 5500 किमी आहे, जी 7000 किमीपर्यंत वाढवता येऊ शकते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.