“महाराष्ट्राची भूमी ही सहकारासाठी काशी एवढीच पवित्र”

126

केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत प्रवरानगर येथे देशातील पहिली सहकार परिषद आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्राची भूमी ही सहकारासाठी काशीएवढीच पवित्र भूमी असल्याचे वक्तव्य देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केले. सहकार चळवळ मागे का पडली, हजारो कोटींचे नुकसान का झाले असे अनेक सवाल परिषदेत अमित शहा यांच्याकडून उपस्थित करण्यात आले आहेत.

सहकार चळवळ मागे का पडली ?

सहकार चळवळ मागे का पडली याचा अभ्यास केला पाहिजे. केवळ सरकारने मदत करून चालणार नाही. आपल्यातील दोषही आपण दूर केले पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे. सहकाराकरिता काहीही मदत लागली तरी नरेंद्र मोदी सरकार 24 तास तुमच्या मदतीसाठी तयार आहे. असे आश्वासन अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलं आहे. गुजरातमधील अमूल हे सहकार क्षेत्राचे उत्तम उदाहरण आहे असेही शहा म्हणाले.

( हेही वाचा : शिवसेनेच्या मुळावर उठलेले अनिल परब गद्दार! कदमांचा परबांवर हल्लाबोल )

ही भूमी काशी एवढीच पवित्र

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पूर्वी जिल्हा बँकांचं जाळं होतं पण, अलिकडे या बॅंका गेल्या कुठे मी राजकीय भाष्य करायला आलो नाही. पण सहकार आंदोलनातील कार्यकर्त्यांना सांगेन की, सरकार तुमच्या पाठीशी आहे. असा विश्वास अमित शहांनी दिला आहे. केंद्रीय सहकारी मंत्री यांनी प्रवरानगर येथील भूमीचे वर्णन करताना , ही भूमी सहकारीता क्षेत्रात काशी एवढीच पवित्र आहे. त्याकाळात बाळासाहेब विखे पाटील आणि धनंजयराव गाडगीळ यांनी सहकाराची चळवळ रोवली. सहकार क्षेत्रात काम करणाऱ्यांनी या भूमीत येऊन नतमस्तक व्हायला हवं असे मत शहा यांनी व्यक्त केले.

मोदींनी सुरू केले सहकार क्षेत्र

पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील,धनंजयराव गाडगीळ व वैकुंठभाई मेहता यांनी देशातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर येथे सुरू केला.देशातील सहकारी क्षेत्राच्या दृष्टीने या भूमीचे महत्व काशी इतकेच मोठे आहे. महाराष्ट्राने सहकारात दिलेले योगदान हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर 75 वर्षात कधी ही कोणाला केंद्रात सहकार मंत्रालय सुरू करण्याची गरज वाटली नाही. मात्र पंतप्रधान मोदी यांनी सहकाराचे महत्व लक्षात घेऊन आता सहकार मंत्रालय सुरू केले आहे. आपण सहकार तोडण्यासाठी नाही तर जोडण्यासाठी आलो आहोत. मात्र सहकार क्षेत्राने देखील पारदर्शक होणे व आधुनिक पद्धतीने कामकाज करण्याची आवश्यकता आहे. देशपातळीवर सहकार क्षेत्राकरिता नवीन धोरण तयार केले जात आहे. त्या माध्यमातून सहकार क्षेत्रात नवीन प्राण फुंकण्याचे काम केले जाणार आहे. केंद्र व राज्य सरकार ने एकत्र येऊन सहकार क्षेत्राला संकटातून बाहेर काढण्यासाठी काम केले पाहिजे. असे अमित शाह यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.