सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने बैलगाडा शर्यतीसाठी सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे आता तब्बल 7 वर्षांनंतर बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार आहे. 7 वर्षांनंतर महाराष्ट्रात बैलगाडा शर्यती आयोजित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी विधानसभेपासून लोकसभेपर्यंत मागणी झाली. घोडा-बैलांवरील अत्याचार थांबावेत, म्हणून एकाच गाडीला घोडा-बैल जुंपण्यास बंदी होती. मात्र तुम्हाला माहित आहे का, ही बैलगाडा शर्यत महाराष्ट्रात कशी आली..जाणून घ्या
(हेही वाचा- हुररर्र….राज्यात 7 वर्षांनी बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार!)
म्हणून बैलगाडी अस्तित्वात आली
असे सांगितले जाते की, 14 व्या शतकाच्या सुमारास ईशान्य स्पेनमध्ये बैलांसमोर धावण्याची परंपरा सुरु झाली. ‘एन्सिएरो ऑफ पॅम्प्लोना’असे नाव असलेल्या या शर्यतीत त्वेषाने धावणाऱ्या बैलांसमोर जीवाच्या आकांताने पळताना अनेक जणांना उत्साह वाटत असे. 18-19 व्या शतकात स्पेनपासून अनेक मैल अंतरावर असलेल्या आशिया खंडात, सुरुवातीला भारत देशात, ग्रामीण भागात दळणवळणासाठी बैलगाडीचा वापर केला जायचा. बैलांचा प्रजोत्पादनासाठी मर्यादित राहिलेला वापर पुढे सामान, कृषी उत्पादन आणि मानवी वाहतुकीसाठीही होऊ लागला. दरम्यान, बैलाच्या आक्रमक स्वभावाचा इतर उपयोग व्हावा, या हेतूने आधी बैलगाडी अस्तित्वात आली. त्यावेळी बैलाची मालकी आणि देखभाल करणं हा अभिमानाची गोष्ट मानली जायती. ज्यांना परवडत होतं, त्यांनी बैलगाडी शर्यतीत उतरण्याचे ठरविले आणि बैलांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.
कोणत्या नावाने बैलगाडा शर्यतीला ओळखले जाते
महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब याशिवाय मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातही बैलगाडा शर्यती खेळल्या जातात. या राज्यात बैलगाडा शर्यतीला कोणत्या नावे ओळखले जाते वाचा…
- महाराष्ट्रात या खेळाला शंकरपट
- कर्नाटकात कंबाला
- तामिळनाडूत रेकला
- पंजाबमध्ये बौलदा दी दौड
म्हणून बैलगाडा शर्यतीवर बंदी आली
बैलांवर अन्याय होतो, या कारणाने बैलगाडा शर्यती बंद झाल्या नव्हत्या. तर बैलाचा समावेश पाळीव प्राण्यामध्ये केला जातो. पाळीव प्राण्यांना शर्यत किंवा प्रदर्शनात बंदी आहे, म्हणून बैलगाडा शर्यतीवर बंदी घालण्यात आले असल्याचे सांगितले जाते. 2018 साली मुंबई उच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतीला स्थगिती देणाऱ्या आदेशाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली. न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि सी. टी. रविकुमार यांच्या खंडपीठासमोर महाराष्ट्राच्या विशेष याचिकेवरील अंतरिम अर्जावर सुनावणी झाली. यानंतर 2021 मध्ये न्यायालयाने बैलगाडा शर्यतीसाठी सशर्त परवानगी दिली आहे.
Join Our WhatsApp Community