शाळा सुरू; पण शिक्षकच वर्गाबाहेर

147

कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून राज्यातील शाळा-महाविद्यालये बंद होती, मात्र आता राज्य सरकारने पुन्हा शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतले, असे असतानाच दुसरीकडे शिक्षकांना शिक्षणबाह्य कामांसाठी बाहेर पडले आहे. त्यामुळे एक बाजुला शाळेत मुले आली आहेत, तर दुसरीकडे शिक्षक वर्गाबाहेर आहेत, अशी स्थिती आहे.

शिक्षक नाराज

राज्यात काही ठिकाणी शिक्षकांना लसीकरणबाबत माहिती संकलित करणे, निवडणूकपूर्व कामे, तसेच आता ओबीसी आरक्षणासाठी इम्पिरीकल डेटा जमा करण्यास शिक्षकांना शाळे बाहेर फिरावे लागत आहे. त्यामुळे शाळा सुरू आहेत, पण शिक्षकच नाहीत, अशी शाळांची अवस्था आहे. कोरोनामुक्त भागात जुलैमध्ये आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. शहरी भागात आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागात पाचवीपासूनचे वर्ग ऑक्टोबरमध्ये सुरू झाले. तर जवळपास पावणेदोन वर्षांनंतर डिसेंबरपासून पहिलीपासूनचे वर्ग सुरू झाले. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने सुरू असलेले शैक्षणिक कामकाज आता पूर्वपदावर येऊ पाहत आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या काळात शिक्षकांना दारूच्या दुकानांवर, तपासणी नाक्यांवर काम करायला लागले होते. तर काही ठिकाणी शिक्षकांना लसीकरण तपासणी, पुण्यातील अनुदानित, शासकीय शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांच्या शिक्षकांना निवडणूकपूर्व अशी कामे करावी लागत असल्याने शिक्षकांकडून नाराजीचा सूर उमटत आहे.

(हेही वाचा शिवसेनेच्या मुळावर उठलेले अनिल परब गद्दार! कदमांचा परबांवर हल्लाबोल)

तर शिक्षकांना कोरोना होण्याची शक्यता

प्रदीर्घ काळानंतर शाळा सुरू झालेल्या असताना विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काय याचा विचार केला जात नाही, असे एका शिक्षकाने सांगितले. तर निवडणूकपूर्व कामांसाठी मतदारसंघांमध्ये घरोघरी फिरावे लागणार आहे. हेच शिक्षक शाळेतही जाणार आहेत. त्यामुळे शिक्षकांना कोरोनाची लागण झाली, त्यातून शाळेत प्रसार झाल्यास काय करायचे, असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.