अमित शहांचे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडे, म्हणाले…

169

महापालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यात असल्याने भाजपने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाने अमित शाह यांनी पुणे दौऱ्याला सुरुवात केली आहे. यावेळी मंदिरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते बाप्पाची आरती करण्यात आली. तसेच केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते अभिषेकदेखील करण्यात आला आहे.

गणपतीसमोर घातले गा-हाणे 

महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देश देखील कोरोनामुक्त होवो. आत्मनिर्भर भारताचे आपले ध्येय लवकर पूर्ण होवो आणि अयोध्येतील राम मंदिराची उभारणी निर्विघ्नपणे होवो. असे मागणे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी दगडूशेठ गणपतीसमोर मागितले. गणरायाला महाअभिषेक करताना अमित शहा यांनी सुजलाम् सुफलाम् भारतासाठी देखील प्रार्थना केली.

गृहमंत्र्यांच्या हस्ते आरती 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे स्वागत तसेच सन्मान करण्यात आला.  ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, माणिक चव्हाण, विनायक रासने, मंगेश सूर्यवंशी आदी यावेळी उपस्थित होते. अमित शहा यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली.

 ( हेही वाचा :शिवसेनेच्या मुळावर उठलेले अनिल परब गद्दार! कदमांचा परबांवर हल्लाबोल )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.