भारतात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे रूग्ण वाढत असून ओमिक्रॉनग्रस्तांची संख्या 145 झाली आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक ओमायक्रॉनबाधित आढळले आहेत. शनिवारी ओमायक्रॉनच्या 8 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या ही 48 वर पोहोचली आहे.
राज्यातील ओमायक्रॉनच्या एकूण 48 रुग्णांपैकी मुंबई येथे 18, पिंपरी चिंचवड येथे 10, पुणे ग्रामीण येथे 6, पुणे मनपा क्षेत्रात 3 कल्याण डोंबिवली येथे 2, उस्मानाबाद 2, बुलढाणा 1, नागपूर 1, लातूर 1 आणि वसई विरार येथे 1 अशा रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 28 रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
ओमायक्रॉनग्रस्तांची राज्यनिहाय आकडेवारी
महाराष्ट्र – 48, दिल्ली – 22, तेलंगणा – 20, राजस्थान – 17, कर्नाटक – 14, केरळ – 11, गुजरात – 07, उत्तर प्रदेश – 02, आंध्र प्रदेश – 01, चंदीगड – 01, तामिळनाडू – 01, पश्चिम बंगाल – 01
(हेही वाचा ‘हिंदुस्थान पोस्ट’ इम्पॅक्ट! अखेर ‘हुतात्मा स्मारक चौक’ नावाचे लागले नवे फलक)
भारतात आढळले 7081 नवे कोरोनाग्रस्त
देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 7 हजार 81 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 264 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, ओमिक्रॉनच्या व्हेरियंटची लागण झालेले 145 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 83 हजार 913 वर पोहोचली आहे. तसेच कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या वाढून 4 लाख 77 हजार 422 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, काल (शनिवारी) 7469 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 3 कोटी 41 लाख 78 हजार 940 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यासोबतच राष्ट्रव्यापी लसीकरण मोहीमेंतर्गत आतापर्यंत कोरोना व्हायरसवरील लसीच्या डोसची संख्या 137 कोटी इतकी झाली आहे. शनिवारी 28 डिसेंबर रोजी 76 लाख 54 हजार 466 लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यानंतर आतापर्यंत कोरोना लसीचे 137 कोटी 46 लाख 13 हजार 252 डोस देण्यात आले आहेत.
Join Our WhatsApp Community