केरळ राजकीय हत्यांनी हादरले! ‘या’ पक्षांचे नेते बनले लक्ष्य

115

केरळच्या आलाप्पुझा येथे 24 तासांत झालेल्या 2 राजकीय हत्याकांडानंतर जमावबंदी लावण्यात आली आहे. अवघ्या 12 तासाेत झालेल्या दोन हत्यांमुळे वातावरण तणावपूर्ण बनले आहे. त्यामुळे कुठलीही अप्रिय घटना टाळण्यासाठी आलाप्पुझा येथे धारा 144 लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

रणजीत श्रीनिवास यांची राहत्या घराबाहेर हत्या

यासंदर्भातील माहितीनुसार एसडीपीआयचे कार्यकर्ते शान के.एस. शनिवारी 18 डिसेंबर रोजी रात्री आपल्या स्कूटरवरुन मन्नाचेरी येथील घरी जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोर हे दुचाकीवरुन आले होते. हल्लेखोरांनी धारदार चाकूने त्यांच्यावर हल्ला केला. जखमी झालेल्या शान यांना उपचारासाठी एर्नाकुलम येथील जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, उपचारा दरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. या हत्येला 12 तास उलटण्यापूर्वी आज, रविवारी सकाळी डाव्या पक्षाच्या लोकांनी भाजप ओबीसी मोर्चाचे नेते रणजीत श्रीनिवास यांची राहत्या घराबाहेर हत्या केली.

(हेही वाचा शिवरायांचा अवमान: दुस-या दिवशीही सेना आक्रमक)

गुन्हेगारांवर कठोर कारवाई 

पोलिसांनी सांगितले की, भाजप नेते मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले असता 8 जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. चाकू हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असता त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान केरळचे मुख्यमंत्री पनाराई विजयन यांनी अलाप्पुझा येथे दोन राजकीय नेत्यांच्या हत्येप्रकरणी निषेध व्यक्त केला आहे. सरकार कुणालाही कायदा हातात घेऊ देणार नाही. गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.