सध्या महाराष्ट्रात स्थानिक निवडणुकांची रणधुमाळी रंगली आहे. निवडणुकांच्या प्रचारादरम्यान शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांना डिवचताना महिलांसंबंधी आक्षेपार्ह विधान केले. माझ्या मतदार संघातील रस्ते हे हेमा मालिनीच्या गालांसारखे आहेत, असे गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले. त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी गुलाबराव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच, आता राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी गुलाबरावांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असा इशारा दिला आहे.
अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल
एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून, गुलाबराव पाटील यांनी असं विधान करणे हे निषेधार्ह आहे. आपल्या मतदारंघातील रस्त्याची तुलना त्यांनी एका महिला खासदाराच्या गालासोबत केली, या विधानाबाबत जाहीर माफी मागा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल, असा इशारा रुपाली चाकणकर यांनी दिला. तसंच, एका वस्तूची तुलना महिलेच्या रंग रुपासोबत करणे, ही संस्कार आणि संस्कृती अत्यंत नीच पातळीची आहे. आपण महिलांना दुय्यम वागणूक देतात, हे चुकीचं आहे. पाटील यांनी माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल, असंही चाकणकर म्हणाल्या.
काय म्हणाले गुलाबराव!
गुलाबराव पाटील यांनी बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत विरोधक एकनाथ खडसे यांना डिवचताना, आक्षेपार्ह टीका करत वाद ओढावून घेतला आहे. माझे तीस वर्ष राहून चुकलेल्या आमदारांना चॅलेंज आहे, त्यांनी माझ्या मतदारसंघात येऊन पाहावं की मी काय विकास केला. हेमा मालिनीच्या गालासारखे रस्ते मी केले. तुम्ही महाराष्ट्राला काय गुण शिकवता, असा सवालदेखील गुलाबराव पाटील यांनी केला.
( हेही वाचा :महाविकास आघाडीवरून सेनेत धुसफूस! सरनाईक, देसाई, कदमांनंतर हेमंत पाटील वैतागले )
Join Our WhatsApp Community