विरोधी पक्ष महागाईच्या नावाने गळा काढत होते, म्हणून मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलवरील दर कमी केले. त्यामुळे इंधनाचे दर 15-20 रुपयांनी कमी झाले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी राज्यांनाही इंधनावरील कर कमी करण्याचे आवाहन केले. त्याप्रमाणे भाजपाशासित राज्यांनी ताबडतोब इंधनांवरील आणखी कर कमी केले. मात्र, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारची ऐकण्यात गल्लत झाली, त्यांना कदाचित पंतप्रधान मोदी यांनी इंधन नव्हे, तर दारुचे दर कमी करायचे असे समजून ठाकरे सरकारने थेट दारुच स्वस्त करुन टाकली, असा मिष्किल टोला देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी पुणे येथे भाजपाच्या कार्यकर्त्या मेळाव्यात बोलताना ठाकरे सरकारला मारला.
तेव्हा इंधिरा गांधी हरल्या होत्या
ठाकरे सरकार वसूली सरकार बनले आहे. मात्र, भाजपाच्याच कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल करुन अडकवत आहेत. काॅंग्रेसने अशाचप्रकारे 19 महिने भाजप पक्ष बंधिस्त ठेवला होता. त्यानंतर मात्र, झालेल्या निवडणुकीत स्वत: इंदिरा गांधी पराभूत झाल्या होत्या. आज संसदेत ‘हम दो हमारे दो’ अशी हिनवणी काॅंग्रेसवाले भाजपाची करत आहेत. एकेकाळी खरेच संसदेत भाजपाचे दोन खासदार होते, आणि तेव्हा अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी हे दोघे हरले होते. त्यावेळचे भाजपाचे ‘हम दो हमारे दो’, आज 305 झाले आहेत. आज भाजपाला हिनवणारे 45 वर आले आहेत, असा सणसणीत टोला अमित शहा यांनी काॅंग्रेसला लगावला आहे.
( हेही वाचा: अरे देवा, आता लोकलमध्येही नमाज पठण )
हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि भाजपाशी दोन हात करा
सत्तेसाठी शिवसेनेने भाजपाचा विश्वासघात केला. हिंदुत्व सोडले आणि दोन्ही काँग्रेससोबत सत्तेत बसली,अशी महाआघाडी जनतेला मंजूर नाही. हिंमत असेल तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि दोन हात करण्यासाठी मैदानात उतरावे, तुम्ही तीन पक्ष आणि भाजप एकटा असा सामना होऊ द्या, असे थेट आव्हान गृहमंत्री अमित शहा यांनी दिले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे होते, म्हणून त्यांनी भाजपाला सोडले. हिंदुत्व सोडले भाजपचा विश्वासघात केला. सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्व सोडून दिले. आणि दोन्ही काँग्रेससोबत सत्तेत बसली. म्हणून शिवसेनेत हिमंत असेल, तर त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि निवडणुकीसाठी दोन हात करण्यासाठी समोर यावे. सिद्धांतहीन राजनीती जनतेला स्वीकार नाही, असेही मंत्री अमित शहा म्हणाले.
( हेही वाचा :हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि भाजपाशी दोन हात करा! )
सरकारची 3 चाकी रिक्षा चालते तेव्हा प्रदूषणाशिवाय काही बाहेर पडत नाही
महाराष्ट्रातील सरकार तीन चाकाची रिक्षा आहे. या रिक्षाचे तिन चाकं तीन दिशेला आहेत. अन आता तिन्ही चाकं पंक्चर झाली आहे. जेव्हा ही रिक्षा चालते तेव्हा प्रदूषणाशिवाय काहीही बाहेर पडत नाही, अशी टीकाही शाह यांनी यावेळी केलीय. येणाऱ्या पुणे महापालिका निवडणुकीत लक्ष्य कमी ठेवू नका. पुण्यातील जनता तुम्हाला भरभरुन द्यायला तयार आहे, असा विश्वासही शाह यांनी व्यक्त केला. अमित शाह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. त्यांची तब्येत ठिक नाही. पण जेव्हा ठिक होती तेव्हा तरी कुठं बोलले. मी प्रार्थना करतो की त्यांची तब्येत ठिक व्हावी. महाराष्ट्रातील सरकार कुठे आहे? लोक शोधत आहेत, असा घणाघात शाह यांनी केला. तसंच सत्तास्थापनेवेळी बोलणं झालं होतं. मी होतो. निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील. पण नंतर उलटले. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्यांनी आमच्यासोबत विश्वासघात केला, असा गंभीर आरोप शाह यांनी यावेळी केला.
Join Our WhatsApp Community