कोकणचो हापूस मुंबईत इलो रे…!

141

देवगड तालुक्यातून आंब्याची पहिली पेटी पाठवण्याचा मान कुणकेश्वर-वाळकेवाडी येथील उपक्रमशील आंबा बागायतदार अरविंद सीताराम वाळके व सिताराम अरविंद वाळके यांनी यांनी प्राप्त केला आहे. अरविंद वाळके यांनी देवगड हापूसच्या पाच डझनाच्या पाच पेट्या १९ डिसेंबरला नवी मुंबई येथील एपीएमसी मार्केटला विक्रीसाठी पाठविल्या. यातील प्रत्येक आंबा २७५ ग्रॅम ते ३०० ग्रॅम या वजनाचा आहे.

याोग्य भरपाई मिळत नाही

नवी मुंबई येथील एपीएमसी मार्केट मधील कंपनीच्या माध्यमातून या फळांची विक्री होणार आहे. तसेच वाळके यांनी एएसडब्ल्यू या नावाने ब्रँड तयार केला आहे. निश्चितच हंगामापूर्वी झालेल्या आंब्याला चांगला दर मिळेल. बदलत्या हवामानामुळे व अवेळी पडणाऱ्या पावसामुळे आंबा बागायतदारांचा गेल्या चार-पाच वर्षात मोठे नुकसान झाले आहे. आंबा बागायतदारांना पीक विमा काढून सुद्धा योग्य भरपाई देण्यात येत नाही. विभागांमध्ये उभारण्यात आलेले हवामान केंद्राच्या योग्य नोंदी उपलब्ध होत नसल्यामुळे नुकसान भरपाई सुद्धा योग्य प्रकारे मिळत नाही, असं आंबा बागायतदार वाळके यांनी सांगितले.

( हेही वाचा : पाटण तालुक्यातील गावक-यांकडून सांबाराची शिकार )

पूर्णतः सेंद्रिय खतांचा वापर

वाळके यांच्या हापूस आंबा बागेतील दहा कलमांच्या झाडावर जुलै महिन्याच्या अखेरीस मोहोर आला होता.  हा आलेला मोहर टिकवणे ही खरी कसरत होती. त्यासाठी त्यांनी पावसाचा हंगाम असतानाही औषधांची फवारणी केली. मोहरावर बुरशीचा उपद्रव होऊ नये यासाठी त्यांना बुरशीनाशकांची फवारणी जास्त प्रमाणात करावी लागली. तसेच सुरुवातीचे आंबा फळ टिकविण्यासाठी व त्याची गळ थांबवण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करण्यात आली. झाडाला पूर्णतः सेंद्रिय खतांचा वापर करण्यात आला होता. कोणत्याही प्रकारे नवसंजीवकांचा वापर करण्यात आला नाही. त्यामुळे प्राप्त आंब्याची प्रतवारी उत्कृष्ट झाल्याची माहिती वाळके यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.