“खर्‍या गुन्हेगारांचा शोध घ्यायचा असेल तर प्रकरण सीबीआयला सोपवा”

118

शिक्षक पात्रता परीक्षेतील अर्थात टीईटी परीक्षा गैरव्यवहाराप्रकरणी पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपेंच्या घरावर धाड टाकली. तुकाराम सुपेकडे 88 लाख रुपये सापडल्यानंतर आज आणखी 2 कोटी रुपये रोख आणि सोने सापडले. दरम्यान, या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही आक्रमक झाले आहेत. फडणवीस यांनी ट्वीट करत मुख्यमंत्र्यांकडे पेपरफुटीप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. लाखो विद्यार्थ्यांना वेठीस धरणार्‍या खर्‍या गुन्हेगारांचा शोध घ्यायचा असेल तर हे प्रकरण सीबीआयला सोपवा अशी विनंती देखील त्यांनी यावेळी केली आहे.

राज्य सरकार कोणता निर्णय घेणार

यापूर्वी म्हाडातील पेपरफुटीनंतर परीक्षा रद्द करण्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढवली होती. त्यानंतर हे टीईटी, पोलीस भरती घोटाळ्याचे प्रकरण त्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सरकारवर टीका होत आहे. त्यानंतर फडणवीसांनी आता सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे राज्य सरकार याप्रकरणी कोणती कठोर निर्णय घेणार? हेही पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

(हेही वाचा – गाढवं नामशेष होणार! झपाट्याने होतेय घट, सर्वेक्षणातून…)

‘घोटाळ्यातील गुंतागुंत पाहता सीबीआय चौकशी व्हावी’

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, आता या जीए सॉफ्टवेअरचे संचालक डॉ. प्रीतिश देशमुखकडे पोलिस भरतीची ओळखपत्र सापडली आहेत. म्हणजे आरोग्य भरती, म्हाडा, टीईटी, पोलिस भरती हे सर्व घोटाळे एकाच माळेचे मणी दिसताहेत. या सर्व घोटाळ्यातील गुंतागुंत पाहता सीबीआय चौकशी व्हायलाच हवी, सीबीआय चौकशी झाली तरच या घोटाळ्यांमधील मंत्रालयातील धागेदोरे उघड होतील, अन्यथा वसुलीचे हे आणखी एक प्रकरण कधी उजेडात येणारच नाही, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.