मागील वर्षीच्या तुलनेत यंदा देशातील तिळाचे उत्पन्न साधारणतः २५ टक्क्यांनी घटणार आहे. त्यामुळे संक्रांतीच्या तोंडावर तिळाच्या दरात तेजी कायम राहणार आहे. इतर पिकांच्या तुलनेत तिळाच्या उत्पादनात एकरी उत्पन्न कमी मिळत असल्याने, देशात तिळाचे उत्पन्न कमी होत आहे. परिणामी, चार महिन्यांत तिळाच्या दरात ४०-५० रुपयांनी वाढ झाली आहे.
तिळाचे उत्पन्न कमी
देशात तीळ उत्पादित राज्यात अवेळी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने उत्पादनाला मोठा फटाका बसला आहे. त्यामुळे यंदा तिळाचे उत्पन्न कमी झाले आहे. तसेच, पावसामुळे तीळ हलका आणि कमी दर्जाचा, डागी तिळाचे उत्पादन जास्त निघाले आहे. बाजारात सध्या दर्जेदार तिळाला जास्त मागणी आहे. देशात खरीप हंगामात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू आणि ओडिशा या राज्यांत तिळाचे उत्पादन घेतले जात असल्याची माहिती मार्केट यार्डातील तिळाचे व्यापारी अजित बोरा यांनी दिली.
( हेही वाचा : आता ऐश्वर्या बच्चन ईडीच्या रडारवर! काय आहे भानगड? )
संक्रांतीला तिळाला विशेष महत्त्व
वर्षातील पहिला सण मकर संक्रांतीला तिळाला विशेष महत्व आहे. यादिवशी तिळाचे दान केल्याने पुण्य मिळते. म्हणून लोक एकमेकांना तिळाचे लाडू देऊन तिळगुळ घ्या व गोड गोड बोला अशा शुभेच्छा देतात. त्यामुळे ऐन सणाच्या दिवसात तिळाच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांचीही निराशा झाली आहे.
Join Our WhatsApp Community