आठवड्याच्या सुरूवातीलच शेअर मार्केटमध्ये ‘ब्लॅक मंडे’!

शेअर बाजारात पहिल्याच दिवशी घसरण

119

शेअर बाजारात आज, सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घसरण झाली. शेअर मार्केटवर ओमिक्रॉनच्या सावटामुळे परिणाम पडल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. सेन्सेक्स आज 56 हजार आणि निफ्टी 16,500 च्याही खाली गेल्याचे दिसून आले. त्यामुळे आज शेअर मार्केटमध्ये ‘ब्लॅक मंडे’चा अनुभव आला असून एकाच दिवसात गुंतवणूकदारांच्या तब्बल 9 लाख कोटीहून अधिक रुपयांची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.

जगातील शेअर मार्केटचा परिणाम मुंबई शेअर मार्केटवर

आज मार्केट बंद झाल्यानंतरच्या आकडेवारीनुसार, सेन्सेक्स (बीएसई) तब्बल 1,189.73 अंशांनी म्हणजेच 2.09 टक्क्यांनी तर निफ्टी (एनएसई) 371 अंशांनी म्हणजेच 2.18 टक्क्यांनी घसरला आहे. जगभरातल्या विविध शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेल्या घसरणीचा परिणाम मुंबई शेअर मार्केटवरही झाल्याचं दिसून आलं आहे.

कोरोनामुळे गुंतवणुकदारांच्या चिंतेत वाढ

कोरोना व्हायरसच्या महासाथीमध्ये ओमिक्रॉनच्या व्हायरसमुळे तिसऱ्या लाटेच्या शक्यतांमुळे गुंतवणुकदारांच्या चिंता वाढवल्या आहेत. सर्व सेक्टर्स लाल निशाण्यावर होते. यामध्ये आयटी, बँक, ऑटो, फायनान्स सर्व्हीस, एफएमसीजी, मीडिया, मेटल, फार्मा, पीएसयू बँक, प्रायव्हेट बँक आणि रियाल्टी देखील समाविष्ट आहे. शेअर बाजारात आज, सोमवारी ट्रेडींगदरम्यान सेन्सेक्समध्ये फक्त हिंदुस्तान युनिलीव्हरचे शेअर्स हिरव्या निशाण्यावर होते. मात्र, ते देखील लाल निशाण्यावर गेले.

(हेही वाचा – “खर्‍या गुन्हेगारांचा शोध घ्यायचा असेल तर प्रकरण सीबीआयला सोपवा”)

याव्यतिरिक्त डॉक्टर रेड्डी, विप्रो, नेस्ले इंडिया, पॉवर ग्रीड, एशियन पेंट्स, टीसीएस, सन फार्मा, इन्फोसिस, एचसीएल टेक, मारुती, टायटन, टेक महिंद्रा, भारती एअरटेल, आयटीसी, कोटक बँक, एम अँड एम, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, ऍक्सिस बँक, रिलायन्स, एचडीएफसी, एल अँड टी, अल्ट्राटेक सिमेंट बजाज फिनसर्व, एनटीपीसी, एसबीआय, टाटा स्टील, इंड्सइंड बँक आणि बजाज फायनान्सचे शेअर लाल निशाण्यावर आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.