राज्यातील ‘या’ जिल्ह्यात मतदानासाठी विशेष सुट्टी जाहीर!

167

जळगाव जिल्हा ग्रामपंचायत रिक्त सदस्य पदांच्या पोटनिवडणूकांकरीता दिनांक २१ डिसेंबर, २०२१ रोजी मतदान होऊन २२ डिसेंबरला रोजी मतमोजणी आहे. यानिमित्त मतदानाचा हक्क बजावण्यासाठी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इ. यांना पुर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दोन तासांची सवलत देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना दिले आहेत.

स्थानिक सुट्टी जाहीर

सदर निवडणूक कार्यक्रमाअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील १४ तालुक्यात ४२ रिक्त सदस्य पदांच्या पोटनिवडणूकीसाठी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. तसेच जळगाव जिल्हयातील ११ तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींमध्ये दिनांक १८ जानेवारी, २०२२ रोजी मतदान होणार असून दिनांक १९ जानेवारीला मतमोजणी आहे. यानुसार ज्या ग्रामपंचायतींमध्ये दिनांक २१ डिसेंबर, २०२१ व दिनांक १८ जानेवारी, २०२२ रोजी मतदान होणार आहे. त्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात मतदानाच्या दिवशी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

( हेही वाचा : महापालिका खुली करणार आंतरराष्ट्रीय शिक्षणाची दारे! )

मतदानाचा अधिकार बजावण्याचे आवाहन

सदर सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागात येणाऱ्या कारखाने, दुकाने इत्यादींना लागू करण्यात आली आहे. राज्य शासन, केंद्र शासन व खाजगी कंपन्या यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्यगृहे, नाटयगृहे, व्यापार औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर रिटेलर्स यांनाही सुट्टी देण्यात आली असून मतदानाचा अधिकार बजावण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.