गेल्या ५४ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. पगारवाढ देऊनही कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. एसटी कर्मचारी कामावर रूजू झाल्यास कारवाई मागे घेतली जाईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्याचे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब व अजय गुजर यांनी केले आहे.
विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागलेले नाही. विलीनीकरणावर आम्ही आजही ठाम आहोत. न्यायलयाचा निर्णय आम्हाला मान्य असेल. असे अजय गुजर यांनी स्पष्ट केले आहे. वेतनवाढीबाबत सरकारने आश्वासन दिले आहे. याबाबत शरद पवारांसोबत देखील चर्चा झालेली आहे. असेही त्यांनी सांगितले. अजय गुजर यांच्या प्रणित संघटनेने संप मागे घेतल्याचे जाहीर केले आहे. एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी जवळपास सहा तासांपासून मंत्रालयात बैठक सुरु होती. या बैठकीला परिवहन मंत्री अनिल परब, व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, महा व्यवस्थापक माधव काळे, तर संघटनेचे अजय गुजर उपस्थित होते.
( हेही वाचा : 2014 साली हिंदूत्ववादी शिवसेनेला कोणी दूर केले? संजय राऊतांचा अमित शहांवर पलटवार )
अनिल परबांचे आवाहन
लालपरीची नाळ ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जोडली गेली आहे. संपामुळे सामान्यांचे हाल होत आहेत. त्रिसदस्यीय समितीचा निकाल आल्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल तसेच कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेण्यात येईल असे आश्वासन देत अनिल परबांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्याचे आवाहन केले आहे.
संघटनेत फूट
प्रणित संघटनेच्या अजय गुजर यांनी संप मागे घेतल्याचे घोषित केले. परंतु कर्मचारी वर्गाने याला विरोध दर्शवला आहे. विलीनीकरण झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही या भूमिकेवर कर्मचारी ठाम आहेत. यामुळेच संघटनेच फूट पडल्याचे दिसून येत आहे.
Join Our WhatsApp Community