मुंबईत कोविड रुग्णांच्या मृत्यूच्या आकडा पुन्हा एकदा सोमवारी शून्यावर आला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर आतापर्यंत पाचव्यांदा रुग्णांच्या मृत्यूने शून्याची किमया साधली असली तरी डिसेंबर महिन्यातील २० दिवसांमध्येच चौथ्यांदा मृतांच्या आकड्याने शून्य एवढा गाठला आहे. त्यामुळे कोविडमुळे एकप्रकारे भीतीचे वातावरण असताना आता अशाप्रकारे मृतांच्या आकडेवारीत शून्याची भरारी ही मुंबईकरांची हिंमत वाढवणारी ठरणार आहे.
एकाही मृत्युची नोंद झालेली नाही
सोमवारी दिवसभरात २०४ नवीन रुग्ण आढळून आले आणि २२४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. कोविड -१९ सुरू झाल्यापासून सहाव्यांदा अशाप्रकारे एकाही मृत्युची नोंद झालेली नाही. यापूर्वी मार्च -२०२० मध्ये कोविड- १९ सुरू झाल्यानंतर यापूर्वी फक्त १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली होती. त्यानंतर मागील शनिवारी एकाही कोविड रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता. सध्या सुरू असलेल्या डिसेंबर महिन्यात आतापर्यंत चौथ्यांदा मुंबईत शून्य मृत्यूची नोंद झालेली आहे. या महिन्यात यापूर्वी ११ डिसेंबर आणि १५ डिसेंबर आणि १८डिसेंबरला शून्य मृत्यूची नोंद झालेली आहे.
( हेही वाचा : परीक्षा ऑनलाइन घ्या! ‘या’ विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची मागणी )
२२४ नवीन रुग्णांची नोंद
तर २० डिसेंबरला दिवसभरात ३० हजार ६७२ चाचण्या करण्यात आल्या नंतर २२४ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे विविध कोविड सेंटर आणि रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ही २ हजार ६१ एवढी आहे. तर मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर हा २ हजार ९५ एवढा आहे. मुंबईत सक्रिय कंटेन्मेंट झोन असलेल्या झोपडपट्टी व चाळीची संख्या शून्य एवढी असून, इमारतींची संख्या १७ एवढी आहे.