मुंबईत अवयवदान, किती जणांना मिळाले जीवनदान?

119

वर्षाचा अखेर जवळ येत असताना मुंबईत ३३ वे अवयदान झाल्याने तीन रुग्णांना नव्याने आयुष्य जगता येणार आहे. परळ येथील खासगी रुग्णालयात ५१ वर्षीय मृत पुरुषाने मरणानंतरही आपल्या शरीरातील अवयवदान केले. मृताच्या नातेवाईकांनी आपल्या मृत नातेवाईकाचे मरणोत्तर अवयवदान करण्याचे ठरवले. गेल्या वर्षाच्या अखेरीपर्यंत मुंबईत अवयवदानाचा आकड्याची तिशी नोंदवली गेली. यंदा कोविडच्या भीतीदायक वातावरणातून बाहेर येताना अवयवदानाचा आकडा तिशीपार गेल्याचे सकारात्मक चित्र आहे.

१८ डिसेंबर रोजी परळच्या खासगी रुग्णालयात ५१ वर्षीय रुग्णाला मेंदू मृत घोषित करण्यात आले. रुग्णाचा मेंदू मृत झाल्यानंतरही इतर अवयव काही कालांतराने बंद पडतात. दरम्यानच्या काळात त्यांना मृताच्या शरीराबाहेर काढल्यास इतर गरजू रुग्णाला प्रत्यारोपणाच्या माध्यमातून देता येतात. याबाबतची माहिती मिळताच मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी दोन मूत्रपिंडे आणि यकृताचे दान केले. या अवयवदानाचा तीन रुग्णांना लाभ झाला.

(हेही वाचा आता ऐश्वर्या बच्चन ईडीच्या रडारवर! काय आहे भानगड?)

यंदाच्या वर्षीही ‘त्या’ तुलनेने कमीच अवयवदान

कोविड अगोदर मुंबईतील अवयवदानाने नवा उच्चांक केला होता. त्या तुलनेत २०२० पासून अवयवदानाची संख्या ५० टक्क्यांहून कमी झाली आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना मुंबईच्या झोनल ट्रान्सप्लान्ट कोर्डिनेशन कमिटीचे अध्यक्ष डॉ. एस.के. माथुर यांनी अवयवदानाची प्रक्रिया जोमाने कार्यरत राहण्यासाठी अवयवदानासाठीचे कार्यरत समन्वयक, सरकारी व पालिका रुग्णालयातील सामाजिक कार्यकर्ते तसेच आम्ही सर्व जनजागृतीवर भर देत असल्याचे सांगितले. पुढील वर्षी हा आकडा नक्कीच वाढेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.