ई-चलनाची भानगड नको म्हणून लढवली जातेय भन्नाट शक्कल…

124

वाहतूक पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमे-यांद्वारे वाहतुकीचे नियमभंग करणा-या वाहनचालकांवरील कारवाई तीव्र केली आहे. सीसीटीव्ही कॅमे-यांद्वारे कारवाई केल्यानंतर नियमभंग करणा-या वाहन  चालकांना मोबाईल क्रमांकावर ई-चलन पाठविण्यात येत आहेत. या कारवाईपासून वाचण्यासाठी काही वाहन चालकांनी ई-चलनापासून वाचण्यासाठी भन्नाट शक्कल लढवली आहे.

नंबर प्लेटच बदलल्याचा प्रकार

वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियमभंग केले म्हणून, ज्या वाहनचालकांवर कारवाई करत त्यांना ई-चलन पाठवले, ते ई- चलन भरावे लागू नये, म्हणून वाहन क्रमांकाची नंबर प्लेटचं बदलल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे ज्या वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचा भंग केलेला नाही, अशांनाही दंडात्मक कारवाईचे संदेश आले आहेत. गेल्या 10 महिन्यांत पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडे 8 हजाराहून अधिक वाहनचालकांनी अशा प्रकारच्या तक्रारी केल्या आहेत. नियमभंग करणा-या वाहनचालकांऐवजी नियमांचे पालन करणा-या वाहनचालकांना दंडात्मक कारवाईचे संदेश आले आहेत. ज्यांना दंडात्मक कारवाईचे संदेश आले आहेत, त्यांनी चौकशी केली असता, दंडात्मक कारवाईच्या ऑनलाईन संकेतस्थळावर नियमभंग करणा-या वाहनचालकाच्या छायाचित्रात दुसरीच व्यक्ती आढळून आली.

(हेही वाचा महाराष्ट्र बंद : उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला विचारला जाब! म्हणाले…)

वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढली 

अशा स्वरुपांच्या तक्रारीत वाढ झाली आहे. वाहतूक पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी काही वाहनचालक मुद्दाम नंबर प्लेटमध्ये बदल करत असल्याचे वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. आकर्षक रंगसंगतीत असलेल्या फॅन्सी नंबरप्लेट पाट्यांवर मुद्दाम वेगळ्या पद्धतीने वाहन क्रमांक टाकले जात आहेत. काही वाहनचालक तर नंबर प्लेट वर दादा, भाऊ, अप्पा, तात्या अशा नावांचा वापर करत आहेत. शहरातील प्रमुख चौकातील सीसीटीव्ही कॅमे-यांद्वारे करण्यात येणा-या कारवाईत फॅन्सी नंबरप्लेट वापरणारे वाहनचालक पकडले गेल्यास त्यांचे क्रमांक शोधणेही वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील कर्मचा-यांना अवघड झाले आहे. जरी वाहनाच्या नंबर प्लेटवरील क्रमांक जुळवून पाहिला तरी तो क्रमांक दुस-याच व्यक्तीचा असल्याने त्या व्यक्तीला दंडात्मक कारवाईचे संदेश जात आहेत. काही वाहनचालकांच्या खोडसाळपणामुळे नियमांचे पालन करणा-या वाहनचालकांना निष्कारण कारवाईस सामोरे जावे लागत आहे.

 ( हेही वाचा :अरे व्वा! चक्क लोकलमध्ये मिळणार वायफाय )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.