वेल्सच्या गोवर बेटांवरील व्हाईटफोर्ड पॉईंट लाईटहाऊसच्या एका फोटोकरिता छायाचित्रकार स्टीव्ह लिडियार्ड यांना हिस्टॉरिक फोटोग्राफर ऑफ द ईयर 2021 चा पुरस्कार देण्यात आला आहे.
जॅान बोवेन यांनी बनवलेल्या डिझाईननुसार 1865 मध्ये हे लाईटहाउस बांधण्यात आले होते. 1854 मध्येही इथे एक इमारत होती, पण आता मात्र त्याचे अवशेष उरलेले नाही. या आकाराचा हा ब्रिटनमधील एकमेव कास्ट आयरन टॅावर आहे. लाटांचा मारा खाऊनही आज ही इमारत मोठ्या दिमाखात उभी आहे.
हिस्टॅारिक फोटोग्राफर ऑफ द ईयर 2021 या स्पर्धेसाठी पाठवण्यात आलेले फोटो हे त्या फोटोंच मुल्यांकन, त्यांच महत्त्व, तांत्रिक उपयोग, तसेच या फोटोच्या मागची कहाणी तसेच, त्याचा ऐतिहासिक प्रभाव या बाबींवर करण्यात आलं आहे.
या स्पर्धेत परीक्षक म्हणून इतिहासकार डॅन स्त्रो यांनी काम पाहिले. डॅन स्त्रो म्हणतात, हा पुरस्कार स्पर्धकांच्या एका परफेक्ट फोटो क्लिक करण्याच्या इच्छा आणि प्रयत्नांना अधोरेखित करतो. एका चांगल्या फोटोसाठी फोटोग्राफर अख्खी रात्र जागून काढू शकतात, पर्वतांवर चढाई करतात, दुर्गम ठिकाणांचाही प्रवास करतात.
या स्पर्धेत ब्रिस्टनच्या क्लिफ्टन सस्पेन्शन ब्रिजच्या फोटोने प्रथम क्रमांक पटकावला आहे. हा फोटो सॅम बायडिंग यांनी काढला आहे. बायडिंग म्हणतात, मी नियमितपणे माझ्या श्वानाला फिरवण्यासाठी क्लिफ्टन ब्रिजला जातो. हा ब्रिज शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जातो. त्यादिवशी धुक्यांमुळे ब्रिजच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली होती.
जिथे इतिहास घडला असा जो एक गट या स्पर्धेत असतो. त्या गटात या फोटोची निवड करण्यात आली. इयान मॅक्कलम यांनी ड्रोनच्या सहाय्याने हा फोटो क्लिक केला आहे. 1960 मध्ये सेवर्न नदीत बुडालेल्या वेस्टेल एच आणि आर्कनडेल एच जहाजांचा एक फोटो घेतला. ही दोन्ही जहाजे एकमेकांशी धडक होऊन बुडाली होती.
या स्पर्धेच आणखी काही फोटोंना नामांकन मिळाले आहे, ते पाहुयात
Join Our WhatsApp Community