परीक्षा घोटाळ्यानंतर आता ठाकरे सरकारचा निकाल घोटाळा!

112

सध्या महाराष्ट्रात परीक्षा घोटाळा चर्चेत आला आहे. यात कोट्यवधींचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणी टीईटीचे आयुक्त तुकाराम सुपे याला अटक करण्यात आली. आता निकाल घोटाळा उघडकीस आला आहे. भाजपचे नेते, आमदार अतुल भातखळकर यांनी हा निकाल घोटाळा उघडकीस आणला आहे.

सर्वांना ९९.९७ टक्के गुण 

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या २०१९ च्या नोकर भरतीचा निकाल १५ डिसेंबर २०२१ रोजी रात्री लावण्यात आला. यामध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे यातील सर्व उमेदवारांना सामान गुण मिळाले आहेत. त्यात सर्वांना ९९.९७ टक्के गुण मिळालेले आहेत. हे सरकार नुसते परीक्षेत नाही, तर निकालातही घोटाळा करत आहे, असे भाजपचे आमदार भातखळकर यांनी ट्विटरद्वारे म्हटले आहे. या ट्विटमध्ये अतुल भातखळकर यांनी निकालाची यादीही प्रसिद्ध केली आहे. ठाकरे सरकार हे केवळ परीक्षा घोटाळाच करत नाही, तर परीक्षा घेतल्यानंतर निकाल घोटाळाही करत आहे, असा आरोप अतुल भातखळकर यांनी केला.

पेपर फुटी प्रकरणी सुपेकडून दीड कोटींची रोकड जप्त

आरोग्य विभाग, म्हाडा परीक्षा घोटाळाप्रकरणी अटक करण्यात आलेले महाराष्ट्र परीक्षा मंडळाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्या घरातून पहिल्या धाडीत ८८ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केल्यानंतर आता दुसऱ्या धाडीत दोन कोटींहून अधिक रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. सुपेच्या घरातून १ कोटी ५८ लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने हस्तगत केल्याची माहिती आहे. याआधी झालेल्या धाडीत पोलिसांनी ९० लाखांचं घबाड हस्तगत केलं होतं.आरोग्य विभागाच्या पेपर कुठे प्रकरणात आतापर्यंत १८ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

(हेही वाचा कोरोना लसीच्या प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो: न्यायालय म्हणते ‘त्यांना जनाधार आहे!’)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.