राज्यभरात देवस्थानांच्या जमिनीचा घोटाळा सुरु आहे आणि या घोटाळ्यास भाजपचे मंत्री जबाबदार आहेत, असा खळबळजनक आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच, भाजप आमदार रामाची जागा, विठोबाची जागा लाटत आहेत. यामध्ये हजारो कोटींचा घोटाळा झाला असल्याचंही नवाब मलिकांनी सांगितलं आहे.
11 एफआयआर दाखल
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी बोलताना सांगितले की, मागील काही दिवसांपूर्वी ईडीने वक्फ बोर्डाच्या ऑफिसवर छापा टाकण्यात आला असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी आल्या, मात्र आम्ही स्पष्ट केले होते की, असे काही नव्हते. महाराष्ट्रामध्ये बोर्डाच्या माध्यमातून आत्तापर्यंत आम्ही 11 एफआयआर दाखल केल्या आहेत. यातील पहिली एफआयआर नांदेड, औरंगाबाद, बुराहण शाह वली परभणी, जालना, पुणे, बदलापूर, औरंगाबाद, आणि दोन्ह गुन्हे आष्टी बीड येथे दाखल केलेले आहेत. या सोबतच काही खाजगी लोकांनी मशिदीच्या बाबतीत गुन्हा दाखल केला आहे. ते टाकळी बीड येथील रहिवाशी आहेत.
(हेही वाचा कोरोना लसीच्या प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो: न्यायालय म्हणते ‘त्यांना जनाधार आहे!’)
10 ठिकाणी देवस्थानच्या जमिनीत केलेले भ्रष्टाचार
बीडमध्ये 3 ठिकाणी सर्व्हिस इनाम जमीन होती. ती मदत इनाम जाहीर करून त्यावर खाजगी नाव चढवण्यात आले आणि प्लॉटींग करण्यात आले, तसेच त्याची विक्री केली जात आहे. यासोबतच राम खाडे यांनी 10 ठिकाणी देवस्थानच्या जमिनीत केलेले भ्रष्टाचार समोर आणले आहेत. यातील 7 हिंदू देवस्थान आहेत आणि 3 मुस्लिम देवस्थान आहेत, असे नवाब मलिक म्हणाले. तसेच, यामध्ये विठोबा देवस्थान 31 एकर 42 गुंटे, खंडोबा देवस्थान 35 एकर, राम देवस्थान 65 एकर, खंडोबा देवस्थान बेळगाव 65 एकर अशा अनेक ठिकाणांचा समावेश होत असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community