2014 ला माॅब लिचिंग, तर 1985 ला काय आंधळी कोशिंबीर होती का?

110

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंजाब आणि देशातील काही भागांमध्ये अलीकडच्या काळात घडलेल्या मॉब लिंचिंगच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आरोप केला आहे की, 2014 साली नरेंद्र मोदी सरकार स्थापन होण्यापूर्वी ‘लिंचिंग’ हा शब्द तरी ऐकला होता का? ‘धन्यवाद मोदी जी’ या हॅशटॅगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत राहुल गांधी यांनी  ट्विट केले की, ‘2014 पूर्वी ‘लिंचिंग’ हा शब्दही ऐकला नव्हता. आता राहुल गांधी यांना सणसणीत उत्तर देताना, भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये 1984 ला ज्या शिख दंगली घडवून आणल्या, ती आंधळी कोशिंबीर होती काय, असा अचूक सवाल केला.

असं आहे ट्विट

राहूल गांधी यांच्या ट्विटनंतर आता भाजपाने काॅंग्रेसवर प्रतिहल्ला केला आहे. भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत, ‘2014 च्या आधी लिंचिंग शब्द ऐकायला मिळत नव्हता…’ असे राहुल गांधींचे म्हणणे आहे. मग 1984 साली इंदिराजींच्या दुर्दैवी हत्येनंतर सुमारे 5 हजार शिख बंधूंची झालेली कत्तल, खुद्द इंदिराजी पंतप्रधान असताना दिल्लीत आंदोलनकर्त्या साधूंवर झालेला अमानुष गोळीबार ही आंधळी कोशिंबीर होती काय?, असा थेट आणि अचूक सवाल काॅंग्रेसला केला आहे. 

नुकत्याच घडलेल्या घटना

रविवारी पंजाबमधील कपूरथला येथील निजामपूर गावात एका गुरुद्वारामध्ये शीख धर्माच्या ‘निशान साहिब’ (ध्वजाचा) अनादर केल्याबद्दल जमावाने अज्ञात व्यक्तीची हत्या केली होती. याआधी शनिवारी, अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात कथित विटंबनेप्रकरणी जमावाने आणखी एका व्यक्तीला बेदम मारहाण केली होती.

 ( हेही वाचा: BMC महापालिकेच्या मुख्यालयासमोरच विनामास्क विक्रेत्यांचा ‘बाजार’! )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.