गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर सर्वसामान्य माणसांच्या खिशाला परवडणारे नसून त्याचे दर गगनाला भिडतांना दिसताय. अशातच पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली असताना महाराष्ट्रात त्याची बेसुमार विक्री झाल्याचे समोर आले आहे. तर दूसरीकडे सरकार पेट्रोल-डिझेलवरील इंधन करातून मोठ्या प्रमाणात कमाई करत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात सर्व पेट्रोलियम उत्पादनांच्या विक्री कर आणि वॅटद्वारे अधिक महसूल जमा केला आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक वसूली
मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने मागील वर्षी पेट्रोल-डिझेलवरील कर आणि सेसद्वारे 6.58 लाख कोटी रूपये वसूल केले आहेत. यामध्ये केंद्राला 4.55 लाख कोटी रूपये आणि राज्यांना 2.0 लाख कोटी रूपये मिळाले आहेत. तर महाराष्ट्रात सर्वाधिक वसूली ही कराच्या माध्यमातून केली आहे. महाराष्ट्राने मागील आर्थिक वर्षात 25,430 कोटी रुपये जमवले. त्यानंतर उत्तर प्रदेशचा क्रमांक येतो. उत्तर प्रदेशने मागील वर्षी 21,956 कोटींची वसूली केली. त्यानंतर तामिळनाडूने 17,063 कोटी रुपयांचा कर जमवला.
(हेही वाचा –BMC महापालिकेच्या मुख्यालयासमोरच विनामास्क विक्रेत्यांचा ‘बाजार’!)
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी तरीही…
सोमवारी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी संसदेला असे सांगितले की, केंद्र सरकारने मागील आर्थिक वर्षात पेट्रोल-डिझेलवरील कर आणि सेसमधून एकूण 4,55,069 कोटी जमवले. तर, या कालावधीत राज्य सरकारांनी विक्री कर आणि वॅटमधून एकूण 2,02,937 कोटींची कमाई केली असल्याचे सांगितले जात आहे. ज्यावेळी इंधन दरवाढ करण्यात आले त्यावेळी सामान्य नागरिकांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला. नंतर 3 नोव्हेंबर रोजी पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 5 रुपये आणि डिझेलवरील 10 रुपयांची कपात केली. ही कपात करण्यात आल्यानंतरही पेट्रोल-डिझेलची किंमत वाढतच राहिली. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी होत असताना देखील देशातील इंधनाचे दर कमी होत नसल्याचे दिसताय.
Join Our WhatsApp Community