बापरे! ख्रिसमसच्या तोंडावर गोव्यात आढळले कोरोनाग्रस्त प्रवासी

110

ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी अनेक जण परदेशांतून गोव्यात दाखल होतात. गोवा कार्निव्हलमुळे तसेच ३१ डिसेंबरला नवे वर्ष साजरे करण्यासाठी अनेक प्रवासी गोव्याला आवर्जून भेट देतात. सामाजिक जीवनात कमी निर्बंध, रम्य समुद्रकिनारे, गोव्याची खाद्यसंस्कृती यामुळे गोवा हे राज्य अलिकडच्या दिवसात पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे. ऐन सेलिब्रेशनच्या दिवसात गोव्यात दाखल झालेल्या परदेशी प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे.

आरोग्य मंत्र्यांची माहिती

युनायटेड किंग्डम येथून गोव्यात दाखल झालेल्या प्रवासी नागरिकांपैकी चार लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सर्व बाधितांना कॅन्सॉलिम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. युनायटेड किंग्डम येथून गोव्यात दाखल झालेल्या सर्वांची चाचणी करण्यात आल्याचे गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी ट्वीटरद्वारे स्पष्ट केले.

( हेही वाचा : झपाट्याने पसरतोय ओमायक्रॉन! देशभरात तब्बल एवढे रुग्ण )

देशभरात ओमायक्रॉन रुग्णांत वाढ

ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये सध्या झपाट्याने वाढ होत आहे. देशभरात २०० हून अधिक ओमायक्रॉन रुग्ण आढळून आले आहेत. यामुळेच खबरदारी म्हणून आरोग्य मंत्रालयाने, नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा व कोविड नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. यानुसार प्रत्येक विमानतळावर परदेशी प्रवाशांच्या कोरोना चाचण्या होत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.