महापालिका विद्यार्थ्यांच्या हाताला वळण लावणार ‘रेनॉल्ड’!

114

रेनॉल्ड कंपनीच्या वतीने भारत व दक्षिण आशिया प्रमुख रजत व्होरा यांच्या मार्गदर्शनाखाली सी. एस. आर फंडामार्फत मुंबई महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पेनचे वाटप करण्यात आले. या निधीतून झालेल्या पेनचे वितरण महापौरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना लोअर परळ येथील ना. म.जोशी मार्ग प्राथमिक मराठी शाळा क्रमांक -१ येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केले गेले. त्यामुळे आता महापालिका शाळांमधील मुलांच्या हाताला वळण लावताना रेनॉल्डचे पेन दिसणार आहे.

महापौरांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन

या पेन वाटपाच्या प्रातिनिधीक कार्यक्रमांत बोलतांना, महापौरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, कोविडचे संकट अजून पूर्णपणे टळले नसून विद्यार्थ्यांनी नियमितपणे मूखपट्टी वापरली पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे आपण तिसऱ्या लाटेला थोपवून धरले आहे. मुंबई महानगरपालिकेचे शिक्षक अत्यंत गुणी असून विद्यार्थ्यांनी एक चांगला नागरिक बनण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. स्वतःला काय आवडतं, ही आवड निश्चित करून त्यामध्ये प्रगती केली पाहिजे. प्रामाणिक प्रयत्न केले तर यश हमखास मिळतेच. जी गोष्ट तुम्ही करणार आहात ती गोष्ट आत्मविश्वास बाळगून धाडसाने करा, धाडसाने बोला. तुम्हाला चांगले संस्कार देणारी ही शिक्षक मंडळी असून गुरुजनांचे संस्कार सुद्धा तेवढेच महत्त्वपूर्ण असल्याचे महापौरांनी सांगितले. त्याचप्रमाणे कोविड काळात धाडसाने काम केल्यामुळे आपण कोविडवर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवू शकलो असल्याचे महापौरांनी सांगितले.

(हेही वाचा – …म्हणून अनिल देशमुखांना ठोठावला 50 हजारांचा दंड)

याप्रसंगी उप शिक्षणाधिकारी आशा मोरे, प्रशासकीय अधिकारी सुनंदा मिरजकर, शाखाप्रमुख गोपाल खाडये, रेनॉल्ड कंपनीच्या मार्केटिंग विभागाच्या प्रमुख दिपाली देशमुख, विभाग निरीक्षक कांचन गोसावी उपस्थित होत्या.

राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचाही गौरव

त्यासोबतच कब विभागांमध्ये सुवर्ण बाण हा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त करणाऱ्या दहा विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण महापौरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर गाईडमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर इंग्रजी शाळेच्या सात विद्यार्थिनींनी राज्य पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल त्यांना महापौरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच ना.म.जोशी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यानी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये खो-खो मध्ये ब्राँझपदक, टेबल टेनिस, कबड्डीमध्ये पुरस्कार प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा महापौरांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.