थंडीच्या मोसमात तुम्ही गारेगार वारे अनुभवण्यासाठी सकाळीच मॉर्निंग वाॅकसाठी घराबाहेर जात असाल तर सावधान…ही गारठवणारी थंडी तुमचे आरोग्य बिघडवू शकते. एरव्ही सकाळचे मॉर्निंग वाॅक आणि ऐन हिवाळा जोमात असताना सकाळचे मॉर्निंग वाॅक यात बराच फरक राहतो. विशेषतः दमेकरी रुग्णांना थंडीच्या दिवसांतील मॉर्निंग वाॅक किंवा प्रवासदायक त्रासदायक ठरु शकतो. त्यामुळे सकाळचा प्रवासही शक्यतो टाळण्याचे आवाहन डॉक्टर करत आहेत.
सर्दी, खोकल्याचे रुग्ण ३० टक्क्यांनी वाढले
ऑक्टोबर हीट सरल्यापासून रोजच्यापेक्षा सर्दी, खोकल्यांच्या रुग्णांमध्ये वाढ होते. गेल्या आठवड्यांपासून सर्दी, खोकल्याचे रुग्ण ३० टक्क्यांनी वाढल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. दमेकरी रुग्णांमध्येही प्रचंड वाढ आहे. लोकलमध्ये लटकताना गारेगार वारे शरीराला जास्त जाणवतात. कित्येकदा बसेसमध्येही थंडीचा अशाच पद्धतीने अनुभव येतो. त्यामुळे शक्यतो प्रवासादरम्यान तब्येत सांभाळा, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
(हेही वाचा झपाट्याने पसरतोय ओमायक्रॉन! देशभरात तब्बल एवढे रुग्ण)
तब्येतीकडे दुर्लक्ष करु नका
उत्तर भारतात थंडीची लाट आल्याने उत्तरेकडील राज्यांतील बहुतांश भागांतील तापमान उणे अंश सेल्सिअसमध्ये उतरले आहे. कडाकडणा-या थंडीचे वारे मध्य प्रदेशापर्यंत वाहत असल्याने सध्या राज्यात थंडी वाढली आहे. विदर्भातील बहुतांश भागांत सलग दुस-या दिवशी किमान तापमान दहा अंशाखाली नोंदवले गेले आहे. मध्य महाराष्ट्रातही थंडीचा प्रभाव चांगलाच जाणवत आहे. काही भागांत किमान तापमान १२ अंशावर आहे. पुढील दोन दिवस किनारपट्टी भागांतील किमान तापमानात दोन ते तीन अंशाने घट होईल, असा अंदाज आहे, त्यामुळे तब्येतीकडे दुर्लक्ष करु नका, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
Join Our WhatsApp Community