परीक्षा घोटाळ्याचा आणखी एकाला उत्तर प्रदेशातून अटक

115

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव सौरभ त्रिपाठी असे आहे. सौरभ त्रिपाठी हा जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा माजी संचालक आहे. टीईटी परीक्षा 2018 मध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी पुणे पोलिसांनी सौरभ त्रिपाठी याला ताब्यात घेतले आहे.

सौरभ त्रिपाठी जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीचा माजी संचालक

2018 सालच्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या निकालात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात पुणे पोलिसांनी सौरभ त्रिपाठी याला ताब्यात घेतलं आहे. सौरभ त्रिपाठी हा जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीचा माजी संचालक आहे. त्याने 2018 सालच्या टीईटी परीक्षेच्या निकालात गैरव्यवहार केल्याचा ठपका त्याच्यावर आहे. याप्रकरणी उत्तरप्रदेशातील लखनऊ येथून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

(हेही वाचा मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्ती ‘या’ आमदाराची ८ तास चौकशी)

अश्विन कुमार याला आधी केली अटक

अपात्र असलेल्या विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांना पात्र दाखवण्याचे काम सौरभ त्रिपाठी हा करत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. टीईटी भरती घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांनी यापूर्वी जी ए सॉफ्टवेअरच्या अश्विन कुमार याला अटक केली आहे. अश्विन कुमार याला कर्नाटकातील बंगळुरू येथून अटक केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.