हिवाळी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला सत्ताधारी पक्षाने चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता, मात्र त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थिती राहणार आहेत, अशी चर्चा सुरु होती, परंतू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहिलेच नाही. त्यामुळे सत्ताधारी दावा करूनही मुख्यमंत्री का आले नाहीत, म्हणून सत्ताधारी अडचणी सापडले असता मुख्यमंत्री ठाकरे का आले नाहीत, याचे कारण उजेडात आले आहे.
खडबडीत रस्त्यामुळे मुख्यमंत्री घराबाहेर पडलेच नाही
कार्यक्रमाला येण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ज्या रस्त्याने येणार होते, तो रस्ता खडबडीत आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांना त्रास होईल म्हणून मुख्यमंत्री बंगल्याच्या बाहेर पडलेच नाही. मात्र आता बुधवारपासून सुरु झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात तरी मुख्यमंत्री येणार का, अशी चर्चा सुरु झाली असताना पुन्हा एकदा रस्त्याचा विषय चर्चेत आला आहे. वर्षा बंगल्यापासून विधानभवन दरम्यानच्या रस्त्याचा काही भाग खडबडीत आहे, त्यामुळे अधिवेशनात तरी मुख्यमंत्री यावेत याकरता महापालिकेला कामाला लावण्यात आले आहे.
(हेही वाचा मुख्यमंत्र्यांचा आजार चिंताजनक…)
अजित पवार म्हणतात मुख्यमंत्री येणारच
दरम्यान मुख्यमंत्री ठाकरे चहापानाच्या कार्यक्रमाला उपस्थितीत राहणार असे सत्ताधाऱ्यांनी सांगूनही मुख्यमंत्री उपस्थित राहिलेच नाही, त्यावर माध्यमांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री अधिवेशनाला तरी उपस्थित राहणार का, अशी वारंवार विचारणा केली असता पवार यांनी मुख्यमंत्री अधिवेशनाला उपस्थित राहणारच, हे मी स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का, अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या अधिवेशनातील उपस्थितीतीवर ठाम मत मांडले. मात्र त्यासाठी महापालिका काय करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Join Our WhatsApp Community