सॅनिटरी नॅपकिनला मेंस्ट्रुअल कपचा पर्याय? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

162

स्त्री आणि मासिक पाळी याविषयी अनेक सामाजिक संस्था, स्त्रीरोगतज्ज्ञ कायम जनजागृती करत असतात. पाळीच्या दिवसात पाच दिवस वेगळे राहणे, धार्मिक विधीत सहभागी होऊ नये, कोणाही समोर खुलेपणाने बोलू नये. या विचारांतून मार्गस्थ होत आपण अलिकडच्या काळात मासिक पाळी विषयावर मुक्तपणे चर्चा करू शकतो. या पाच दिवसात स्त्रियांनी विशेषत: शाळकरी मुलींनी आपल्या आरोग्याची निगा कशी राखायची, याबाबत स्त्रीरोगतज्ज्ञ कायम मार्गदर्शन करतात. सध्या अनेक सामाजिक संस्था मेंस्ट्रुअल कप वापरण्याचा सल्ला देतात. खरंच सॅनिटरी नॅपकिनपेक्षा मेंस्ट्रुअल कप अधिक सुरक्षित आहेत का याविषयी जाणून घेऊया, तज्ज्ञ काय सांगतात.

सॅनिटरी नॅपकिनला मेंस्ट्रुअल कपचा पर्याय?

सॅनिटरी नॅपकिनमुळे अनेक महिलांना आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून तुम्ही तुमच्या कंफर्टनुसार मेंस्ट्रुअल कपचा वापर करू शकता असा सल्ला स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर पारपिल्लेवार यांनी दिला आहे. सॅनिटरी नॅपकिनचे दुष्पपरिणाम नाहीत पण, यामुळे पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात धोका संभावतो यामुळे कंफर्टनुसार मेंस्ट्रुअल कपचा वापर करा असेही त्यांनी सांगितले. तसेच ज्या मुलींना मेंस्ट्रुअल कप वापरण्यास भीती वाटते किंवा त्या कंफर्टटेबल (Comfortable) नसतील तर, अशावेळी सॅनिटरी नॅपकिन वापरावे पण आरोग्यदायी समस्या टाळण्यासाठी वारंवार पॅड चेंज करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

सॅनिटरी नॅपकिन विवाहित महिला अधिक कंफर्टने वापरू शकतात तसेच मेंस्ट्रुअल कप हे आरोग्याच्या दृष्टीने अधिक चांगले आहेत असे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर अशोक आनंद यांनी स्पष्ट केले आहे.

मेंस्ट्रुअल कप म्हणजे काय?

अतिशय मऊ आणि लवचिक रबर किंवा सिलिकॉनचा वापर करून मेंस्ट्रुअल कप  तयार केले जातात. यामुळे रक्तस्राव बाहेर न येता या कपमध्ये गोळा होतो. टॅम्पॉन किंवा सॅनिटरी पॅड्सपेक्षा जास्त रक्त गोळा करण्याची क्षमता मेंस्ट्रुअल कपमध्ये असते. त्यामुळेच सॅनिटरी नॅपकिन सारखं हा कप वारंवार बदलावा लागत नाही. तसेच याचा स्वच्छ करून पुन्हा वापर करता येतो म्हणून पर्यावरणास धोका निर्माण होत नाही.

( हेही वाचा : शक्ती कायद्याविषयीचा अहवाल विधानसभेत सादर! कायदा मंजूर होणार )

ही घ्या काळजी

आपल्या देशात शहरी भाग वगळला तर, आजही कित्येक जणांना मेंस्ट्रुअल कप म्हणजे काय किंवा याबद्दल अनेक गैरसमज निर्माण झालेले आहेत. तसेच अनेक महिला विशेषत: मुली दिवसभरात मेंस्ट्रुअल कप वापरणे टाळतात अशावेळी जर सॅनिटरी नॅपकिन वापरत असाल तर, रॅशेस व इतर आरोग्यदायी समस्या टाळण्यासाठी सॅनिटरी नॅपकिन चेंज करा तसेच सुगंधित नॅपकिन वापरू नका यात केमिकल्सचा समावेश असतो. असा सल्ला स्त्रीरोगतज्ज्ञ देतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.