‘स्पीडगन’… सापळा लावून वाहन धारकांना लुटीचा नवा फंडा!

170

गेल्या काही दिवसांपासून वाहन चालक स्पीडगनमुळे चांगलेच त्रस्त झाले आहेत. अलिकडे शासनाने वाहतूक नियमात मोठे बदल केले आहेत . दंडांच्या रकमा प्रचंड वाढविल्या आहेत . त्याचे चटके पुढे सर्वांनाच असह्य होणार आहेत. महामार्गांवर आता जागोजागी आरटीओच्या गाड्या उभ्या राहतात. त्यात मागे एक ऑटोमॅटिक स्पीडगन कॅमेर्‍यासह लावलेली असते. येणाऱ्या वाहनावर ही गन रोखली, की तिचा वेग आणि गाडी नंबर त्यात रेकोर्ड होतो . गाडी ओव्हर स्पीड असली, की त्याची माहिती ऑनलाईन आरटीओच्या सर्व्हरला जाते. आणि ओव्हर स्पीडसाठी वाहनधारकांना २ हजार रुपयांचा दंड आकारला जातो.

हा दंड ऑनलाईन भरावा लागतो किंवा ऑफलाईन रांग लावून भरावा लागतो. जेव्हा वाहनधारकांचे गाडीची विक्री किंवा अन्य काम आरटीओ ऑफिसला असते. तेव्हा ही भल्या मोठ्या दंडाची यादी गाडी मालकाच्या हातात पडते. तो दंड भरल्याशिवाय पुढील काम होत नाही. बहुतेक वाहन धारकांची ओरड आहे, की हे ऑटो स्पीडगनवाले वाहन ठरवून कोपर्‍यात, अडचणीच्या जागी, उतारावर, घाटउतारावर लावलेले असते आणि उतारावर वेग आपोआप वाढतो. शहरात देखील चौकातील किंवा नो एन्ट्रीचा वाहतूक पोलिस कुठेतरी टपरीआड लपून बसतात. मध्यंतरी अशा ट्रॅफीक हवालदारांजवळ ओरिजिनल शासकीय व खाजगी बनावट अशी दोन प्रकारची पावती पुस्तके असण्याचाही विषय गाजला होता. एका वाहतूक कर्मचार्‍याने तर कोर्टातच वाहतूक विभगाच्या प्रचंड वसूलीचा लेखाजोखा मांडला होता.

स्पीड लिमिटचे फलक लावणे

वास्तविक या ऑटोस्पीडगनची मोहिम सुरुकरण्याअगोदर हायवेवर दर दहा किमीवर स्पीड लिमिटचे फलक लावणे आवश्यक होते . हायवेवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्पीड लिमिट असतात. सरळ रस्त्यावर वेगळे स्पीड लिमिट असते. शहरी, ग्रामीण वस्ती, डोंगराळ भागात, घाटात, शैक्षणिक संकुलालगत, अभयारण्य परिसरात वेगवेगळे स्पीड लिमिट असते. आपण गाडी चालवत आहोत त्या क्षेत्रामध्ये मान्यताप्राप्त स्पीड लिमिट काय आहे ? हे गाडी चालकास कळण्यासाठी जागो जागी फलक लावणे यांना आवश्यक असते.

( हेही वाचा : सिग्नल काउंटडाऊनमुळे नवी मुंबईत झाला गोंधळ! वाचा )

नागरिक संतप्त

स्पीडगनवाले लहान गाडी ९० किमी, ट्रक व दुचाकी ७० किमी वर गेल्यास दंड वसूल करतात असे म्हटले जाते. नागरिक स्पीडगन अधिकाऱ्यांना विचारतात, जागोजागी स्पीड लिमिटचे फलक न लावताच तुम्ही सापळे लावल्यागत ही वसुली कां करतात ? त्यावर अधिकाऱ्यांनी असे स्पीड लिमिटचे जागोजागी फलक लावण्यासाठी आम्ही टोल प्लाझा वाल्यांना पत्रे दिली आहेत. असे स्पष्टीकरण देत आहेत. मग प्रत्यक्ष असे फलक लावले जाण्याआधीच तुमची वसूली का सुरु आहे ? असा सवाल संतत्प नागरिकांनी केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.