राज्य सरकारच्या पाठपुराव्याने बैलगाडा शर्यतीला महाराष्ट्रात परवानगी मिळाली आहे. बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील बैलगाडा शर्यत सुरु करण्यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे, या संदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केले आहे
नियमांचा भंग झाल्यास गुन्हा दाखल होणार
पशुसंवर्धन मंत्री केदार म्हणाले, प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध कारण्याबाबत अधिनियम, 2017 च्यानियमांचे पालन करून राज्यात बैलगाडी शर्यतीच्या आयोजनास राज्य सरकारने परवानगी दिली. या नियमांचा भंग झाल्यास गुन्हे दाखल करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
(हेही वाचा – ‘सरकारचा स्वतःच्या आमदारांवर विश्वास नाही’, फडणवीसांची टीका)
शर्यतीस न्यायालयाने सशर्त परवानगी
उच्च न्यायालयाच्या बंदी आदेशामुळे राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून बैलगाडा शर्यंत बंद होती. या प्रकरणी शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. गेल्याच आठवड्यात न्यायालयाने बैलगाडा शर्यतीस सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. त्यानुसार राज्य सरकारने मंजूर केलेल्या अधिनियम, 2017 च्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून बैलगाडी शर्यत आयोजनास पशुसंवर्धन विभागाने परवानगी दिली असून त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community