मृतांचा आकडा सहाव्यांदा शून्यात, पण बाधितांची संख्या पाचशेच्या घरात

88

मागील काही दिवसांपासून कोविड रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असल्याचे समाधान मुंबईकरांमध्ये असतानाच आता कोविड मृतांचा आकडा शून्यावर येत असल्याने त्यात आणखी भर पडली आहे. बुधवारी पुन्हा एकदा कोविड मृतांचा आकडा शून्यात आला असून आतापर्यंत सहाव्यांदा कोविड मृतांनी शून्य गाठल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. मात्र, एका बाजूला मृतांचा आकडा शून्यात येत असला तरी, बुधवारी कोविड बाधित रुग्णांची संख्या पाचशेच्या आसपास पोहोचल्याने पुन्हा एकदा कोविडची भीती उरात धडकी वाढवणारी आहे.

रुग्णांची संख्या दुपटीने वाढली

बुधवारी दिवसभरात ४९० नवीन रुग्ण आढळून आले आणि २२९ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. विशेष म्हणजे दोन दिवसांपर्यंत दोनशे ते तिनशेच्या आतमध्ये असलेली बाधित रुग्णांची संख्या बुधवारी दुपटीने वाढली. दिवसभरात ४९० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर या डिसेंबर महिन्यातील २२ दिवसांमध्येच पाचव्यांदा मृतांचा आकडा शून्यावर आला आहे. त्यामुळे कोविडमुळे लोकांचे मृत्यू होत असल्याची जी भीती नागरिकांच्या मनात होती, ती सुध्दा आता या शून्यामुळे मुंबईकरांच्या मनातून निघून जात असली तरी वाढलेली रुग्ण संख्या चिंता वाढवणारी आहे. यापूर्वी मार्च -२०२० मध्ये कोविड- १९ सुरू झाल्यानंतर यापूर्वी फक्त १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली होती. त्यानंतर डिसेंबर महिन्यात आतापर्यंत पाचव्यांदा मुंबईत शून्य मृत्यूची नोंद झालेली आहे. या महिन्यात यापूर्वी ११ डिसेंबर आणि १५ डिसेंबर आणि १८डिसेंबर आणि २० डिसेंबर पाठोपाठ २२ डिसेंबरला शून्य मृत्यूची नोंद झालेली आहे.

( हेही वाचा : कोविड सेंटर आणि लसीकरणासाठी ४७ शालेय इमारती, ३७१ वर्गाचा वापर )

मुंबईत पाचव्यांदा शून्य मृत्यूची नोंद

तर २२ डिसेंबरला दिवसभरात ४५ हजार १४ चाचण्या करण्यात आल्या नंतर ४९० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे विविध कोविड सेंटर आणि रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ही २ हजार ४१९ एवढी आहे. तर मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर हा १९६२ एवढा आहे. मुंबईत सक्रिय कंटेन्मेंट झोन असलेल्या झोपडपट्टी व चाळीची संख्या शून्य एवढी असून इमारतींची संख्या १४ एवढी आहे

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.