ओमायक्रोनचा संभाव्य धोका, तरी आरोग्य विभागासाठी पैशाचा तोटा

102

सध्या राज्यात ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. मुंबईतही रुग्ण संख्या वाढत चालली आहे, अशावेळी मुंबईतील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा धक्कादायक अहवाल प्रजा फाऊंडेशनने दिला आहे.

फक्त २० टक्के रक्कम खर्च 

साध्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरु असतानाच मुंबईतील आरोग्य व्यवस्थेत ४५ टक्के जागा रिक्त आहेत, असे प्रजाच्या अहवालात म्हटले आहे. २२ डिसेंबरपर्यंत ७ लाख ६८ हजार ३३ कोरोना रुग्ण आढळून आले, १६ हजार ३६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील मागील आठवड्यात १८० पासून २३० रुग्ण संख्या वाढली. आरोग्य विभागासाठी जेवढी तरतूद करण्यात आली, त्यातील केवळ २० टक्के रक्कम खर्च करण्यात आली आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.

(हेही वाचा बेळगावातील शिवरायांच्या अवमानाचा विधान परिषदेत निषेध)

मुंबई महापालिकेचे अनेक दवाखाने अद्याप बंद आहेत. मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी साडेचार हजार कोटी रुपयांची तरतूद केली जाते; मात्र राष्ट्रीय इमारत बांधकाम संहितेतील मानकांनुसार दर १५ हजार लोकसंख्येमागे एक दवाखाना आवश्यक आहे, परंतु सध्या फक्त १९९ दवाखाने आहेत. यातील १८७ दवाखान्यापैकी १५ दवाखानेच १४ तास सुरू आहेत. उर्वरित दवाखाने अत्यंत कमी वेळ चालतात. आरोग्य केंद्र आणि आपत्कालीन सेवांच्या कामकाज प्रक्रियेचे त्रयस्थ पक्षाकडून ऑडिट करण्याची आणि सुधारणेच्या लक्ष्याधारित उपाययोजना राबवण्याची गरज आहे. क्षयरोगासारखा संसर्गजन्य आजार दर लाख लोकसंख्येमागे शून्यावर आणणे हे ध्येय आहे; परंतु मुंबईत अद्याप एक लाख लोकसंख्येमागे २९८ टीबीचे असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.