मधुमेहावर गुणकारी असल्याचा दावा ठोकणा-या व डॉक्टरांच्या सल्ल्याची गरज नसल्याची जाहिरात करणा-या ‘अमृत नोनी डी प्लस’ या आयुर्वेदिक औषधाचा २५ हजार रुपयांचा साठा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला आहे. नुकतेच अन्न व औषध प्रशासनाच्या कोकण विभाग परिमंडल ३ च्या अधिका-यांनी डोंबिवली येथील मेमर्स मिनी डिस्ट्रीब्युटर या घाऊक औषध विक्रेत्याकडे धाड टाकून ही कारवाई केली.
औषध निरीक्षक नितीन आहेर व पूनम साळगावकर यांनी मेमर्स मिनी डिस्ट्रीब्युटर्सकडे धाड टाकून अमृत नोनी डी प्लसचा माल जप्त केला. ही कारवाई सहाय्यक आयुक्त रा.पं. चौधरी व कोकण विभागाचे सह आयुक्त दुष्यंत भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. संबंधितांवर न्यायलयीन कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले.
(हेही वाचा ओमायक्रोनचा संभाव्य धोका, तरी आरोग्य विभागासाठी पैशाचा तोटा)
आक्षेपार्ह काय आढळले?
हे औषध डायबिटीसवर गुणकारी असल्याचे लेबल औषधावर नमूद करण्यात आले होते. या औषधाचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय होऊ शकतो, हा दावा औषधे व जादूटोणाविरोधी उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४ अंतर्गत नियमबाह्य ठरतो.
अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आजारातून बरे होण्याचा दावा करणा-या औषध कंपन्यांच्या जाहिरातींना जनतेने बळी पडू नये. या जाहिरातींनी न भूलता जनेतेने अन्न व औषध प्रशासनाला तक्रार करावी, असे अन्न व औषध प्रशासन आयुक्त परिमल सिंह म्हणाले.
अन्न व औषध प्रशासन टोल फ्री क्रमांक – १८००२२२३६५
Join Our WhatsApp Community