कोरोनाच्या ओमायक्रॅान या व्हेरिएंटने जगभर धूमाकुळ घातला असतानाच, आता अजून एका नव्या विषाणूची एन्ट्री झाली आहे. कोरोना विषाणूतील जनुकीय बदल दिवसागणिक आरोग्य यंत्रणांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अमेरिका आणि युरोपमध्ये आता डेल्मिक्रॅान या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळत आहेत. डेल्टा आणि ओमायक्रॅानचे जनुकीय रुप असणा-या या विषाणूचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता राज्याच्या आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सतर्क झाल्या असून प्रतिबंधात्मतक उपायांवर भर देत आहेत.
88 टक्के नागरिकांचे लसीकरण
राज्यात ओमायक्रॅानचे रुग्ण सर्वाधिक आहेत. मात्र जानेवारी- फेब्रुवारीपर्यंत हा विषाणू कशा पद्धतीने प्रसार करतो किंवा संसर्गाची स्थिती काय राहते हे पाहणे गरजेचे आहे. दुस-या लाटेत डेल्टामुळे रुग्ण गंभीर होण्याचा धोका अधिका होता, मात्र आता भविष्यात या विषाणूंची वाटचाल कशी राहील हे शास्त्रीयदृष्ट्या करुन पाहता येईल, अशी माहिती क्रिटिकल केअरतज्ज्ञ डॅाक्टर भारेश देढीया यांनी दिली. 88 टक्के देशातील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यामुळे आता सामुहिक रोगप्रतिकारशक्ती वाढत आहे.
यंत्रणा सक्षम असायला हव्या
डेल्टा आणि ओमायक्रॅान नंतर आता या नव्या विषाणूने पुन्हा सतर्क केले आहे. यापूर्वी, कोरोना व डेल्टाशी लढण्याचा अनुभव आहे. त्याचाच आधार घेऊन ओमायक्रॅानशी लढा सुरु आहे. त्यात नवा विषाणूही गतीने पसरत आहे. भविष्यातील जनुकीय बदल लक्षात घेता यंत्रणांनी सक्षम असायला हवे, असे टास्क फोर्सचे डॅाक्टर राहुल पंडित यांनी म्हटले आहे.
( हेही वाचा :ओमायक्रोनचा संभाव्य धोका, तरी आरोग्य विभागासाठी पैशाचा तोटा )
Join Our WhatsApp Community