बाटलीबंद पाणी पिताय? तर हे काळजीपूर्वक वाचा

120

भारतीय मानक ब्युरो (BIS), मुंबई यांनी IS (भारतीय मानक) 14543 नुसार ‘सीलबंद पेयजल बाटलीवरील’ आयएसआय मार्कचा गैरवापर तपासण्यासाठी मंगळवारी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे अंमलबजावणी शोध आणि जप्तीची कारवाई केली.

असा करत होते गैरव्यवहार

मे. अम्मार वॉटर (2298, खोली क्रमांक 3, बस्ती कंपाऊंड, शांतीनगर रोड, नागाव II, भिवंडी-421302, ठाणे) च्या आवारात छापा टाकताना ही संस्था वैध परवान्याशिवाय ‘रीहा’ ब्रँडसह भिन्न परवाना क्रमांक – CM/L.No-7200168205 वापरून सीलबंद केलेले पेयजल भरून बीआयएस प्रमाणन चिन्हाचा (म्हणजे ISI मार्क) गैरवापर करत असल्याचे आढळून आले. छाप्या दरम्यान आयएस 14543:2016 नुसार सुमारे 6 हजार 408 एक लिटर PET (पॉलीथिलीन टेरेफ्थालेट) बाटल्या आणि अर्ध्या लिटरच्या 8 हजार 472 PET बाटल्या जप्त करण्यात आल्या. बीआयएस मुंबईचे अधिकारी निशिकांत सिंग, क श्रेणीचे वैज्ञानिक आणि ब श्रेणीचे वैज्ञानिक विवेकवर्धन रेड्डी, यांनी शोध आणि जप्तीची कारवाई केली होती.

म्हणून केला चिन्हाचा गैरवापर

बीआयएस मानक चिन्हाचा गैरवापर केल्यास दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा बीएसआय कायदा 2016 नुसार किमान 2 लाख रुपये दंडाची किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. गुन्ह्यासाठी न्यायालयात खटला दाखल करण्याची कार्यवाही सुरू केली जात आहे. बनावट आयएसआय चिन्हांकित उत्पादने तयार करून ग्राहकांना मोठ्या नफ्यासाठी विकली जात असल्याचे अनेकवेळा निदर्शनास आले आहे.

 ( हेही वाचा :शिवसेनेचे हिंदुत्व भेंडी बाजारातील! नितेश राणेंचा घणाघात )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.