आदित्य ठाकरेंना धमकी : विधानसभेत सनातनच्या बंदीची मागणी

163

आदित्य ठाकरे यांना मिळालेल्या धमकीचा विषय गुरुवारी, २३ डिसेंबर रोजी विधानसभेत गाजला. त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मागील काही महिन्यांपासून राजकीय क्षेत्रातील नेत्यांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना येत असलेल्या धमक्या सनातन संस्थेच्या सारख्या संस्थांकडून मिळत आहेत. हीच ‘रि’ ओढून मंत्री छगन भुजबळ यांनी सनातनवर बंदी आणण्याची मागणी केली. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याचा प्रतिवाद करताना काँग्रेसच्या काळातच सनातनवर बंदीची मागणी होत होती, पण सबळ पुराव्याअभावी शक्य झाले नाही, आताही दोन वर्षे तुमचे सरकार आहे, तरीही तुम्ही काही करू शकले नाही, या विषयाला फाटे फोडू नये, असेही फडणवीस म्हणाले.

शिवसेना नेते सुनील प्रभू यांनी आदित्य ठाकरे यांच्या धमकी प्रकरणाचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आयपीएस अधिकाऱ्याच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. यावेळी सनातन संस्थेवर बंदी घालण्याबाबतचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. या प्रकरणात कर्नाटक सरकारकडून सहकार्य मिळत नसेल, तर मी स्वत: कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटून चर्चा करेल, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, तर या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केली.

(हेही वाचा सेनेकडून राणी बागेचे हजरत पीर बाबा! नितेश राणेंच्या ट्विटवरून वाद)

चौकशी झालीच पाहिजे

सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मुद्द्यांकडे विधानसभेचे लक्ष वेधले. आदित्य ठाकरेंना धमकी आली त्याचा आम्ही निषेध करतो. मंत्र्यांना कोणी धमकी देत असेल तर त्याला ठेचले पाहिजे. या गंभीर प्रकरणाला राजकीय करण्याचा प्रयत्न सुनील प्रभू यांनी केला. दोन प्रकरणातील आरोपी महाराष्ट्रातील होते. दोन हत्या महाराष्ट्रात झाल्या. दोन कर्नाटकात झाल्या. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांची हत्या कर्नाटकात झाली. गुन्हेगार हे गुन्हेगार असतात त्याला राजकीय वळण देता कामा नये. ट्विटरवर जे ट्रेंडिग झाले. त्याची चौकशी करा माझी मागणी आहे, असे फडणवीस म्हणाले.

…तर सनातनवर बंदी घाला

रझा अकादमीचीही चौकशी करा. दोन वर्षापासून तुमचे सरकार आहे. तुमचा एवढा प्रॉब्लेम आहेत, तर सनातनवर दोन वर्षात बंदी का घातली नाही? या प्रकरणाला फाटे फोडू नका. मुद्दा एवढाच आहे. आदित्य ठाकरेंना धमकी आली आहे. त्याची उच्चस्तरीय चौकशी करावी. सनातनवर बंदी घालण्याच्या 2012मध्ये पहिल्यांदा तुमचे सरकार असताना प्रस्ताव आला. पण तुमचे सरकार केंद्राकडे प्रस्ताव पाठवू शकले नाही. कारण तुम्ही सनातन विरोधात कोणतेही ठोस पुरावे देऊ शकले नाहीत. राज्य जेव्हा यूएपीएच्या अंतर्गत केंद्राकडे पुरावे सादर करत तरच एखाद्या संघटनेवर बंदी घातली जाते. 2013मध्ये हत्या झाल्यानंतर पुन्हा सनातनवर बंदी घालण्याची घोषणा झाली. पण ठोस पुरावे मिळाले नाही. त्यामुळे तुम्हाला सनातनवर बंदी घालता आली नाही. दोन वर्ष आता तुम्ही सत्तेत आहात. तुमच्याकडे ठोस पुरावे असतील तर पाठवा ना, असे आव्हानच त्यांनी सरकारला दिले.

समर्थन नाहीच

सनातन असो की रझा अकादमी असो दहशतवादी कृत्यात सहभागी असलेल्या कोणत्याही संघटनेचे आम्ही समर्थन करणार नाही. हा एक मर्यादित महत्त्वाचा मुद्दा आहे. राज्याचे मंत्री आदित्य ठाकरेंना धमकी आली. त्यामुळे कर्नाटकमधून सरकारला सहकार्य मिळत नसेल तर मी स्वत: कर्नाटकात जाऊन तिथल्या मुख्यमंत्र्यांना भेटून सहकार्य मिळवेन. कारण हा गंभीर विषय आहे. त्याला राजकीय करू नये, असं आवाहनही त्यांनी केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.