लखनऊ येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने ज्येष्ठ वकील आणि काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्यावर उत्तर प्रदेश पोलिसांना त्यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या: नेशनहूड इन अवर टाइम्स’ या पुस्तकात बोको हराम आणि आयएसआय सारख्या दहशतवादी संघटनांशी हिंदुत्वाची तुलना केल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केली आहे.
म्हणून घेतली न्यायालयात धाव
अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी शंतनू त्यागी यांनी खुर्शीद यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आणि उत्तर प्रदेश पोलिसांना तीन दिवसांत एफआयआरची प्रत न्यायालयात पाठवण्याचे निर्देश दिले. संबंधित तरतुदी लागू कराव्यात आणि या प्रकरणाची योग्य चौकशी करावी, असे निर्देश न्यायालयाने अधिकाऱ्यांना दिले. खुर्शीद यांच्या विरोधात शुभांगी त्यागी यांनी तक्रार दाखल केली होती, ज्यांनी पुस्तकातील काही भाग हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला होता. यापूर्वी, त्यागी यांनी खुर्शीद यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यासाठी पोलिस ठाण्यात अर्ज केला होता, परंतु पोलिसांनी त्यांच्या विनंतीवर कारवाई केली नाही, त्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली. हिंदुत्व आणि इसिस यांच्यात तुलना करणाऱ्या खुर्शीद यांच्या पुस्तकाने अनेकांचे लक्ष वेधले होते.
न्यायालयाचे निरीक्षण
पुस्तकाच्या निषेधार्थ नैनितालमधील खुर्शीद यांच्या घराचीही लोकांनी तोडफोड केली. यापूर्वी, खुर्शीद यांच्या पुस्तकावर बंदी घालण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, परंतु ती 25 नोव्हेंबर रोजी फेटाळण्यात आली होती. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी या प्रकरणावर सुनावणी केली आणि निरीक्षण नोंदवले की लोकांना पुस्तक आवडत नसेल तर ते विकत न घेण्याचा पर्याय त्यांच्याकडे आहे. “तुम्ही लेखकाशी सहमत नसाल तर ते वाचू नका. कृपया लोकांना सांगा की पुस्तक खराब लिहिले आहे, काहीतरी चांगले वाचा”. पण आता मात्र न्यायालयाने सलमान खुर्शिद यांच्यावर बोको हराम आणि आयएसआय सारख्या दहशतवादी संघटनांशी हिंदुत्वाची तुलना केल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केली आहे.
( हेही वाचा: मुस्लिम आरक्षण देऊ शकत नाही! नवाब मलिक यांचे विधानसभेत वक्तव्य )
Join Our WhatsApp Community