महानगरपालिकांमार्फत विविध उपक्रम राबवले जातात. असाच एक अनोखा उपक्रम पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने हाती घेतला आहे. सायकल बँक या उपक्रमांतर्गत गरजू, आर्थिक दुर्बल घटकांना महापालिकेमार्फत मदत केली जाणार आहे. अलिकडे पर्यावरण संरक्षणासाठी अनेक जण सायकलचा वापर करतात पण, या सायकल काही दिवसांनंतर अशाच पडून राहतात. म्हणूनच महापालिकेने सायकल बॅंक उपक्रमाची सुरूवात केली आहे.
विनावापर सायकल दान करण्याचे आवाहन
या उपक्रमांतर्गत महापालिकेने नागरिकांना जुन्या, नादुरुस्त व विनावापर सायकल दान करण्याचे आवाहन केले आहे. या सायकल आर्थिक दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांना मोफत भेट म्हणून दिल्या जाणार आहेत. शहरातील बरेच जण सायकल घेतात आणि दोन तीन वर्षे वापरल्यानंतर या तशाच पडून राहतात किंवा नादुरुस्त झाल्याने त्यांचा वापर करत नाहीत. अशा सायकल जवळच्या क्षेत्रीय कार्यालयात दान करण्याचे आवाहन पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे. पालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांत नागरिकांना सायकल जमा करता येईल.
( हेही वाचा : शक्ती कायदा मंजूर, पण खोटी तक्रार केली तर… )
महापालिकेच्या वतीने सन्मान
रिड्यूस, रियुज आणि रिसायकल या पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या उपक्रमात नागरिकांना योगदान देता येईल. सायकल दान करणारे नागरिक, सोसायटी यांना प्रमाणपत्र देऊन पालिकेच्या वतीने सन्मान देखील केला जाणार आहे. असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community