मुंबईकरांनो सावधान, कोविडच्या रुग्णांचा वाढतोय आकडा

115

मुंबईत मागील काही महिन्यांपासून नियंत्रणात आलेला कोविडचा आजार पुन्हा एकदा हातपाय पसरु लागल्याचे चित्र आकडेवारीवरून स्पष्ट होते. बुधवारी पाचशेच्या घरात असणाऱ्या बाधित रुग्णांचा आकडा आता गुरुवारी सहाशे पार पोहोचला आहे. विशेष म्हणजे आजवर ४० हजारांहून अधिक कोविड चाचणी केल्यानंतरही तिनशेच्या आतमध्ये असणारी रुग्ण संख्या गुरुवारी ३९ हजार ४२३ चाचण्या करण्यात आल्यानंतर ६०२ एवढे रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे मुंबईकरांना येत्या २५ डिसेंबर आणि त्यानंतर येणाऱ्या नवीन वर्षांच्या पार्श्वभूमीवर अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

रुग्ण वाढीचा वाढता आलेख

मुंबईत कोविड बाधित रुग्ण वाढीचा आलेख वाढतच जात असून बुधवारी जिथे ४५ हजार १४ कोविड चाचण्या करण्यात आल्यांनतर ४९० रुग्ण आढळून आले होते, तिथे गुरुवारी ३९ हजार ४२३ कोविड चाचण्या करण्यात आल्यानंतर ६०२ नवीन रुग्ण आढळून आले. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत विविध रुग्णालय आणि कोविड सेंटरमध्ये २ हजार ८१३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे एकूण सक्रिय रुग्णांची संख्या जिथे १ हजार ७०० पर्यंत आली होती, ती आता २ हजार ८००वर जावून पोहोचली आहे. दिवसभरात २०७ रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत.

मागील आठ दिवसांपासून रुग्ण दुपटीचा दर २ हजार ५७२ दिवस एवढा होता, तोच दर गुरुवारी १ हजार ७४७ दिवसांवर आला आहे. त्यामुळे रुग्ण दुपटीचा दर ही कमी होत असताना दिसत असून ही चिंतेची बाब मानली जात आहे.

( हेही वाचा : …तर महाराष्ट्रात लागणार नाईट कर्फ्यू! अजित पवारांनी दिले संकेत )

दादर, माहिम आणि धारावीत दोन अंकी रुग्ण संख्या

मागील काही दिवसांपासून दादर, माहिम आणि धारावीमध्ये एक अंकीमध्ये रुग्णांची संख्या येत असतानाच मागील दोन दिवसांपासून दोन अंकीमध्ये रुग्ण संख्या झाल्याचे पाहायला मिळत आहे. बुधवारी या तिन्ही विभागांमध्ये एकूण १२ रुग्ण आढळून आले होते, तर गुरुवारी ही संख्या दहा एवढी होती. यामध्ये दादर व माहिमध्ये जास्त रुग्ण असून धारावीत एक ते दोन रुग्णांची नोंद होत असल्याची माहिती आकडेवारीवरून प्राप्त होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.