विधानसभेत राज्यातील २५ हजार महिला गायब झाल्याची माहिती सरकारने दिली आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करत याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे. या संदर्भात चित्रा वाघ आक्रमक होत म्हणाल्या की, सरकारची जीभ का जड झाली नाही अशी विचारणा करताना नेमकं राज्यात चाललयं काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
संतापलेल्या चित्रा वाघ यांनी केलं ट्विट
“राज्यातील २५ हजार महिला गायब झाल्याची माहिती सरकारनं विधानसभेत दिली आहे. पण हे सांगताना सरकारची जीभ का जड झाली नाही. २५ हजार महिला गायब कशा काय होऊ शकतात? त्यांची तस्करी झालीय का..राज्यात तस्करीचे रॅकेट सक्रीय आहे का? माता भगिनींचं रक्षण करू न शकणारं सरकार आणि कसाई यांच्यात फरक काय?,” अशा शब्दांत व्यक्त होत चित्रा वाघ यांनी ट्विट केले आहे.
(हेही वाचा – शक्ती कायदा मंजूर, पण खोटी तक्रार केली तर…)
राज्यात २५ हजार महिला गायब झाल्याची माहिती सरकारनं विधानसभेत दिलीय पण हे सांगताना सरकारची जीभ का जड झाली नाही..
२५ हजार महिला गायब कशा काय होऊ शकतात?
त्यांची तस्करी झालीय का..राज्यात तस्करीचे रॅकेट सक्रीय आहे का?
माता भगिनींचं रक्षण करू न शकणारं सरकार आणि कसाई यांच्यात फरक काय?— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) December 23, 2021
महिला गायब होणाऱ्यांमध्ये महाराष्ट्राचा चौथा क्रमांक
चित्रा वाघ असेही म्हणाल्या, “सरकारच्या नाकाखाली हे सुरु आहे. पोलीस यंत्रणा नेमकं काय करत आहे? पोलीस यंत्रणा काय फक्त राजकारणी आणि सेलिब्रिटींच्या दावणीला बांधली गेली आहे आणि त्यामुळे या गरीब महिलांना शोधण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. देशात सर्वाधिक महिला गायब होणाऱ्यांमध्ये महाराष्ट्राचा चौथा क्रमांक लागत असून हे भूषणावह नाही.”
सरकार आणि कसाई यांच्यात फरक काय?
पुढे त्यांनी म्हटले की, “माझा गृहमंत्र्यांना थेट प्रश्न आहे. त्या महिलांचे नेमके काय झाले? त्यांची तस्करी झाली आहे का? राज्यात तस्करीचे रॅकेट सक्रीय आहे का? पोलीस त्यांना शोधून का काढत नाहीत? त्यांना शोधण्याची जबाबादारी सरकारची आहे. अन्यथा सरकार आणि कसाई यांच्यात फरक काय?”
Join Our WhatsApp Community