भांडुप येथील पालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसूतीगृहातील वातानुकुलित यंत्रणेमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे नवजात अर्भकांसाठीच्या अतिदक्षता कक्षातील चार दुर्दैवी बालकांचा सेफ्टीक शॉकने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या मुद्द्यावरून आज हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेमध्ये देखील तीव्र पडसाद उमटले असून विरोधकांनी तीव्र संताप व्यक्त केला. दरम्यान, भांडुपमध्ये निषेध व्यक्त करणाऱ्या कुटुंबीयांसोबत शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका राजूल पटेल यांनी केलेलं संभाषण वादग्रस्त ठरलं आहे.
जेव्हा पेशंटला रुग्णालयात दाखल केले तेव्हा आम्हाला विचारलं होतं का? आता जबाबदारी स्वीकारायला सांगता? हे असे चालत नाही, असे महापालिका आरोग्य समिती अध्यक्षा राजुल पटेल म्हणाल्या.@mybmc @ChitraKWagh @KishoriPednekar @IqbalSinghChah2 pic.twitter.com/8PlLc7dVyX
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) December 24, 2021
Maharashtra | 4 infants died at the Savitribai Phule maternity hospital in Bhandup in the last 3 days
allegedly due to septic shockUrban Development Minister Eknath Shinde announced the suspension of the medical officer & has ordered a high-level inquiry into the matter.
— ANI (@ANI) December 23, 2021
राजूल पटेल आणि पालकांमध्ये शाब्दिक बाचाबाची
रुग्णालयातील नवजात अर्भकांसाठीच्या अतिदक्षता कक्षामधील चार बालकांचा सेफ्टीक शॉकनेच मृत्यू झाल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे. या घटनेचा संताप व्यक्त करताना बालकांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयाबाहेर निषेध सुरू केला. या कुटुंबीयांशी संवाद साधण्यासाठी आलेल्या राजूल पटेल यांनी उलट त्यांच्याशीच वाद घालायला सुरुवात केल्याचे समोर आलं आहे. दरम्यान बालकांच्या मृत्यू प्रकरणावरुन सेना नगरसेविका राजूल पटेल आणि पालकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आहे.
(हेही वाचा- भांडुप नवजात बालमृत्यू प्रकरण: सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, भाजपची मागणी)
”आमची कसली जबाबदारी आहे?”
संताप व्यक्त करताना पालकांकडून राजूल पटेल यांना असे विचारण्यात आले की, “आम्ही तुम्हाला निवडून दिलं आहे. या नाकर्तेपणाची जबाबदारी तुम्ही घ्यायला हवी”, मात्र, त्यावर राजूल पटेल उलट या पालकांवरच वैतागल्याचे दिसले. तर “आमची कसली जबाबदारी आहे? निवडून दिलं म्हणजे असं थोडी होतं? कसली जबाबदारी स्वीकारायची? जेव्हा अॅडमिट केलं, तेव्हा आम्हाला विचारलं होतं का जबाबदारी स्वीकारायला? जबाबदारी स्वीकारायला कुठली आहे?” असा सवाल त्यांनीच पालकांना केला.
Join Our WhatsApp Community