वा रे मुंबई पोलिस! त्याने पैसे मागितले म्हणून थोबाड फोडले

111

मुंबईतील बार मालकाकडून खंडणी उकणाऱ्या बडतर्फ सचिन वाझेमुळे मुंबई पोलिस दलाची मलीन झालेल्या प्रतिमेला आणखी एका पोलिस अधिकाऱ्याच्या कृत्यामुळे डाग लागला आहे. हॉटेलमध्ये जेवण केल्यावर बिल मागणाऱ्या हॉटेल मालकाला या पोलिस अधिकाऱ्याने मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सांताक्रूझ पूर्व वाकोला येथे घडलेल्या या घटनेची गंभीर दखल वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडून घेण्यात आलेली असून या व्हिडिओबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.

बील पाहून सुरू केली दादागिरी

विक्रम पाटील असे या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. वाकोला पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. दोन दिवसांपूर्वी विक्रम पाटील हे रात्री वाकोला पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या हॉटेल स्वागत डायनींग बार अँड रेस्टॉरंट या ठिकाणी जेवणासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर पाटील बसलेल्या टेबलावर वेटर याने बील आणून ठेवले. बील बघताच पाटील साहेबांचा पारा चढला आणि त्यांनी पोलिस खाक्या दाखवत माझ्याकडून बील घेणार का? असे विचारत असताना बील काउंटरवर असलेल्या मालकांनी हस्तक्षेप करून साहेब बील तर द्यावा लागेल, असे बोलताच पाटील यांनी थेट मालकावर हात उगारून मारहाण करण्यास सुरुवात केली. हा सर्व प्रकार बील काउंटरवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला.

(हेही वाचा महिलांच्या सुरक्षेसाठी ‘निर्भया’ उपक्रमाचं ‘नवं पाऊल’)

‘आहार’ कडून दखल

हॉटेल मालकाला पोलिसांकडून बिलासाठी झालेल्या मारहाणीचे प्रकरण पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी यांच्यापर्यत दुसऱ्या दिवशी पोहचले. अधिक वाद नको म्हणून वरिष्ठ अधिकारी यांनी स्वतः हॉटेल मालकाला भेटून विक्रम पाटील याला हॉटेल मालकाची माफी मागण्यास सांगितली. मात्र काहीही कारण नसताना पोलिस अधिकारी यांनी हॉटेल मालकाला झालेली मारहाणीची दखल ‘आहार’ कडून घेण्यात आलेली असून हॉटेल मालकाला मारहाण करणाऱ्या अधिकारी विक्रम पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान हॉटेल मालकाला मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ गुरुवारी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आणि फुकटच्या जेवणासाठी पोलिसांनी हॉटेल मालकाला केलेल्या मारहाणीची गंभीर दखल घेण्यात आलेली असून याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.