डेक्कन क्वीनचा बदलणार चेहरामोहरा आणि..

146

देशातील सर्वात जुनी लग्जरी ट्रेन डेक्कन क्वीन लवकरच नव्या रुपात पाहायला मिळणार आहे. सोबतच तिचा वेगही वाढवण्यात येणार आहे. त्यासाठी लागणा-या लिंके हॅाफमन बुश डब्यांची आणि डायनिंग कारची निर्मिती चेन्नईतील आयसीएफ कारखान्यात करण्यात आली आहे. हे डबे येत्या जानेवारीत मुंबईत दाखल होण्याची शक्यता असून, प्रवाशांना नव्या वर्षात या गाडीने प्रवास करता येणार आहे.

डेक्कन क्वीनचा बदलणार चेहरामोहरा

डेक्कन क्विनला ‘दख्खनची राणी’ म्हणूनही ओळखले जाते. आता ही एक्स्प्रेस लवकरच नव्या रंगरूपात दिसणार आहे. या गाडीला विशेष दर्जा असल्याने, रेल्वे प्रशासनाने सामान्य डब्याचा रंग न देता हिरवा व लाल रंग डब्यांना दिला आहे. डेक्कन क्विनही हेरिटेज रेल्वे असल्याने, अहमदाबाद येथील ‘एनआयडी’ने (नॅशनल इन्स्टिट्यूट डिझाइन) याचे आरेखन केले आहे. चेन्नई येथील कारखान्यात डेक्कन क्वीनचे डबे व डायनिंग कार तयार करण्यात आली आहे.

जलद आणि सुरक्षित प्रवास

आतापर्यंत डेक्कन क्विनच्या अठरा डब्यांची निर्मिती पूर्ण झाली आहे. मात्र, डबे अद्याप मुंबईत दाखल झाले नाहीत. या बदलांमुळे पुणे-मुंबई मार्गावरील प्रवाशांच्या मनावर ९१ वर्षे अधिराज्य गाजवणाऱ्या ‘डेक्कन क्वीन’चा प्रवास आता अधिक जलद आणि सुरक्षित होणार आहे.

 ( हेही वाचा: राज्य अशांत,तरीही सरकार मात्र शांत! देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.